Rohit Sharma GT vs MI : प्रत्येक संघाची वेगळी ताकद... गुजरातने गुंडाळल्यावर रोहितने कुणाला दिला दोष?

Rohit Sharma GT vs MI
Rohit Sharma GT vs MIesakal

Rohit Sharma GT vs MI : आयपीएलच्या 16 व्या हंगामात आज गतविजेते गुजरात टायटन्स आणि सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स यांच्यात लढत झाली. सामना अटीतटीचा होईल असे वाटत होते. मात्र गुजरातने मुंबईचा 55 धावांनी मोठा पराभव केला. गुजरातने विजयासाठी ठेवलेल्या 208 धावांचा पाठलाग करताना मुंबईची गाडी 20 षटकात 9 बाद 152 धावांपर्यंतच पोहचू शकली.

पंजाब किंग्जविरूद्ध मुंबईच्या गोलंदाजांनी स्लॉग ओव्हरमध्ये धावांची लयलूट केली होती. याही सामन्यात तोच कित्ता गिरवला गेला. पराभवानंतर निराश झालेला मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने त्यांच्या पराभावाची कारणे सांगितली.

सामना झाल्यावर रोहित शर्मा म्हणाला की, 'हे खूप निराशजनक आहे. आम्ही सामन्यावर पकड मिळवून होते. मात्र शेवटच्या काही षटकात आम्ही खूप धावा दिल्या. प्रत्येक संघाची एक वेगळी ताकद असते. आमच्याकडे चांगली बॅटिंग लाईन अप आहे. आम्ही मोठे टार्गेट चेस करण्यासाठी स्वतःला प्रेरित करत असतो. मात्र आज आमचा दिवस नव्हता.'

रोहित शर्मा पुढे म्हणाला की, 'मैदानावर दव पडले होते. आमच्यासाठी कोणीतरी शेवटपर्यंत फलंदाजी करणे गरजेचे होते. गेल्या सामन्यात आम्ही 214 धावा चेस करताना खूप जवळ पोहचलो होतो. मात्र आत आम्ही फलंदाजीत चांगली सुरूवात करून शकलो नाही. तुम्ही ज्यावेळी 200 प्लसचे टार्गेट चेस करताना खराब सुरूवात ही चांगली गोष्ट नाही. शेवटच्या 7 षटकात देखील आमच्याकडे फारसे फलंदाज शिल्लक नव्हते.'

गुजरातने विजयासाठी ठेवलेल्या 208 धावांचा पाठलाग करताना मुंबईला 20 षटकात 9 बाद 152 धावांपर्यंतच मजल मारता आली. मुंबईचा तब्बल 55 धावांनी पराभव झाला. गुजरातकडून नूर अहमद (3 विकेट) आणि राशिद खान (2 विकेट) यांनी भेदक मारा केला. मुंबईकडून नेहल वधेराने सर्वाधिक 40 धावा केल्या. विशेष म्हणजे गुजरातने आयपीएलमध्ये पहिल्यांदाच मुंबईला पराभवाची धूळ चारली.

(Sports Latest News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com