Rohit Sharma Birthday: सहा IPL ट्रॉफी जिंकणाऱ्या रोहितनं मुंबई इंडियन्सविरुद्ध घेतलेली हॅट्ट्रिक; कोणाला आऊट केलेलं माहितीये का?

Rohit Sharma Hat-Trick: रोहित शर्माने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध हॅट्ट्रिक घेतली असून त्याने कोणाकोणाला बाद केलेलं जाणून घ्या.
Rohit Sharma Hat-Trick for Deccan Chargers against Mumbai Indians 6 time IPL Winner facts
Rohit Sharma Hat-Trick for Deccan Chargers against Mumbai Indians 6 time IPL Winner facts

Rohit Sharma IPL Hat-Trick: रोहित शर्मा हे नाव सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये घेतलं जातं, इतकंच नाही, तर रोहित एक उत्तम सलामीवीरही समजला जातो. त्याचे विक्रमही याचीच साक्ष देतात.

पण अनेकांना हे माहित नसेल की रोहितने जेव्हा क्रिकेटची सुरुवात केली, तेव्हा तो मधल्या फळीतील फलंदाज होता आणि स्पिनर होता. तो बऱ्याचदा गोलंदाजीही करायचा.

विशेष म्हणजे त्याच्या नावावर आयपीएलमध्ये हॅट्ट्रीकही आहे आणि हॅट्ट्रीक त्याने चक्क मुंबई इंडियन्सविरुद्ध घेतली होती.

रोहितची हॅट्ट्रीक

रोहित सध्या मुंबई इंडियन्सकडून खेळत असला, तरी त्याने आयपीएलची सुरुवात केली ती डेक्कन चार्जर्स संघाकडून. रोहितचं आयपीएल पदार्पण डेक्कन चार्जर्स संघाकडून झालं आहे. तो संघाकडून पहिले तीन आयपीएल हंगाम खेळला आणि 2009 साली डेक्कन चार्जर्सला आयपीएल जिंकून देण्यात त्याचा मोलाचा वाटाही होता.

Rohit Sharma Hat-Trick for Deccan Chargers against Mumbai Indians 6 time IPL Winner facts
KKR vs DC : 'टॉससाठी नव्हतं यायला पाहिजे मग!', श्रेयस अय्यरला असं का म्हणाले संजय मांजरेकर?

याच 2009 च्या आयपीएल हंगामात रोहितने हॅट्ट्रीक घेतली होती. सेच्युरियनला 6 मे 2009 रोजी डेक्कन चार्जर्स आणि मुंबई इंडियन्स संघात सामना झाला होता.

या सामन्यात डेक्कनने 20 षटकात अवघ्या 145 धावा केल्या होत्या आणि मुंबईसमोर 146 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. त्यावेळी डेक्कनकडून रोहितने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक 38 धावा केल्या होत्या.

त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या मुंबई इंडियन्सने विजयाच्या दिशेने आगेकुच केली होती. जेपी ड्युमिनी शानदार खेळ करत होता. त्यामुळे मुंबई सहज विजय मिळवेल की काय असं अनेकांना वाटलं होतं. पण याचवेळी डेक्कनचा कर्णधार ऍडम गिलख्रिस्टने 16 व्या षटकात गोलंदाजीसाठी रोहितच्या हातात चेंडू सोपवला. रोहितनेही त्याचा हा विश्वास सार्थकी लावला.

Rohit Sharma Hat-Trick for Deccan Chargers against Mumbai Indians 6 time IPL Winner facts
Sachin Tendulkar Birthday: जेव्हा युवा सचिन भेटलेला दिग्गज सर डॉन ब्रॅडमनला; काय झालेलं त्या भेटीत

रोहितने 16 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अभिषेक नायरला (1) त्रिफळाचीत केलं. त्याच्या पुढच्याच 16 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर त्याने हरभजन सिंगचाही (0) त्रिफळा उडवला. दोन चेंडूत दोन विकेट्स रोहितने या षटकात मिळवून देत मुंबईला मोठा धक्का दिला.

मग 18 व्या षटकात रोहित पुन्हा गोलंदाजीला आला. त्याने या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर 52 धावांवर खेळणाऱ्या ड्युमिनीला माघारी धाडलं. ड्युमिनीचा झेल मागे यष्टीरक्षक गिलख्रिस्टने घेतला अन् रोहितने हॅट्ट्रिकचा आनंद सेलिब्रेट केला. त्याने याच षटकात तिसऱ्या चेंडूवर सौरभ तिवारीलाही माघारी धाडलं.

रोहितच्या या 2 ओव्हरच्या स्पेलने सामनाच डेक्कनच्या बाजूने पालटला. त्याने 2 षटकात अवघ्या 6 धावा देत 4 विकेट्स घेतल्या होत्या. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्धची अजूनही ही सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे. अर्थातर फलंदाजी आणि मग गोलंदाजीत दाखवलेल्या कमालीच्या कामगिरीमुळे रोहित सामनावीर ठरला.

दरम्यान, 2009 मध्ये रोहितने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही क्षेत्रात डेक्कनसाठी महत्त्वाचा वाटा उचलला होता. त्याने त्या हंगामात 16 सामन्यांत 362 धावा केल्या होत्या आणि 11 विकेट्सही घेतल्या होत्या.

Rohit Sharma Hat-Trick for Deccan Chargers against Mumbai Indians 6 time IPL Winner facts
Rohit Sharma Retirement : आयुष्य कुठं घेऊन जाईल... रोहित शर्मा निवृत्तीबाबत पहिल्यांदाच एवढं काही बोलला

तथापि, 2011 मध्ये मुंबईने रोहितला आपल्या संघात घेतलं आणि 2013 मध्ये त्याच्याकडे नेतृत्वही सोपवलं. नंतर रोहितने वरच्या फळीत फलंदाजी सुरु केली आणि त्याची गोलंदाजी मात्र मागे पडली. रोहितच्या नेतृत्वात नंतर मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 या वर्षी आयपीएलचे विजेतेपदही जिंकले.

रोहितने मुंबईसाठी कर्णधार म्हणून 5 वेळा, तर डेक्कनसाठी खेळाडू म्हणून एकदा असे आयपीएलचे एकूण 6 वेळा विजेतेपद जिंकले आहे.

रोहितने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 252 सामने खेळले असून 6522 धावा त्याने केल्या आहेत. यामध्ये 2 शतके आणि 42 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याने 15 विकेट्सही घेतल्या आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com