Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपरने कोणते संकेत दिले?

Rohit will have to play for the mega auction... Know what hints did the former wicketkeeper give?
Rohit Sharma IPL 2024
Rohit Sharma IPL 2024ESAKAL

Rohit Sharma IPL 2024 : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सची यंदाच्या आयपीएल हंगामात चांगली कामगिरी झालेली नाही. ते प्ले ऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडले आहेत. रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन्सीवरून हटवल्यानंतर मुंबईची अवस्था फारच वाईट झाली आहे.

दरम्यान, रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडून दुसऱ्या फ्रेंचायजीकडून खेळू शकतो अशी शक्यता अंबाती रायुडूने व्यक्त केली होती. आता भारताचा माजी विकेटकिपर दीप दासगुप्ताने देखील अप्रत्यक्षरित्या रोहित पुढच्या वर्षी होणाऱ्या मेगा लिलावात उतरू शकतो अशी हिंट दिली.

Rohit Sharma IPL 2024
Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

मुंबई आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यापूर्वी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना दीप दासगुप्ता म्हणाला की, 'तुम्ही आता संघाच्या सन्मानासाठी खेळत आहात. तुम्ही व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून खेळत आहात. तुम्ही तुमच्या आत्मसन्मानासाठी देखील खेळत आहात. तुम्ही प्रत्येक वेळी मैदानात येता त्यावेळी तुमचं बेस्ट देण्याचा प्रयत्न करता.'

'तुम्ही हे विसरू नका की पुढच्या वर्षी मेगा लिलाव होणार आहे. आता व्यावसायिक क्रिकेटपटूंकडे चांगली कामगिरी करण्याची फार कमी संधी राहिली आहे. जरी तुम्ही प्ले ऑफसाठी पात्र होणार नसला तरी तुम्हाला चांगरी कामगिरी करून सर्वांना सांगावं लागेल की माझं नाणं खणखणीत आहे.'

Rohit Sharma IPL 2024
Jonty Rhodes IPL 2024 : बॉल बॉयचा भन्नाट कॅच... टिप्स देणाऱ्या जाँटीने थोपटली पाठ; Video व्हायरल

दीप दासगुप्ता पुढे म्हणाला की, 'जेव्हापासून रोहित भारतीय संघाचा कर्णधार झाला आहे. तो संघाचा एक अविभाज्य घटक झाला आहे. त्याने वरच्या फळीत फलंदाजी करत दमदार कामगिरी देखील केली आहे. हे तो गेल्या दीड वर्षापासून करतोय.'

(IPL 2024 Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com