
Rohit Sharma Joins Mumbai Indians for IPL 2025 : इंडियन प्रिमिअर लीगचा नवा हंगाम सुरू होण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. मुंबई इंडियन्स पहिल्या सामन्यात २३ मार्च रोजी कट्टर प्रतिस्पर्धी समजल्या जाणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जविरूद्ध भिडणार आहे. चेन्नईने सर्वात आधी आयपीएलच्या सरावाला सुरूवात केली. तर मुंबईचे खेळाडू मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर प्रॅक्टीस कॅम्पमध्ये सामिल होत गेले. पण तरीही भारताचा कर्णधार रोहित शर्मा मुंबईच्या कॅम्पमध्ये सामील झाला नव्हता. पण काल 'हिटमॅन'ने बॉलिवूड स्टाईल मुंबईच्या ताफ्यात एन्ट्री केली.