आंतरराष्ट्रीय नेतृत्वाचा ताण IPL मध्ये; आफ्रिकेच्या माजी खेळाडूचं रोहितबाबत वक्तव्य

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवताना मानसिक ताण येत आहे
Graeme Smith Rohit sharma Mumbai Indians Stress
Graeme Smith Rohit sharma Mumbai Indians Stress
Updated on

IPL 2022 : रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने सर्वाधिक ५ वेळा आयपीएल करंडक जिंकण्याची करामत करून दाखवली. मात्र यंदा त्यांची गाडी घसरली आहे. याप्रसंगी दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघाचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ याने, रोहित सध्या कसोटी, एकदिवसीय तसेच टी-२० या भारताच्या तिन्ही प्रकारच्या संघाचे नेतृत्व करत आहे. त्याचा मानसिक ताण रोहितवर आला असून याचे पडसाद आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवताना दिसून येत आहेत, असे स्पष्ट मत व्यक्त केले.(IPL 2022 News)

Graeme Smith Rohit sharma Mumbai Indians Stress
संपलं! सूर्यकुमार यादव बाद झाल्यानं आकाश अंबानी निराश: पाहा व्हायरल फोटो...

रोहित सलामीला फलंदाजीला येतो. ज्या लढतींत तो धावा करतो, त्या लढतींमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ जिंकतो. मात्र भारतीय वन डे व टी-२० संघाचे पूर्ण वेळ नेतृत्व मिळाल्यानंतर तो पहिल्यांदाच आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवत आहे. त्यामुळे त्याच्यावर दबाव येत तर नाही ना, याचा विचार करावा लागणार आहे, असेही स्मिथ म्हणाला.(Rohit sharma Update)

Graeme Smith Rohit sharma Mumbai Indians Stress
IPL 2022: 'कॅमेरामनने बनवले 'या' मुलीचे करियर; RCB गर्ल रातोरात झाली स्टार

मुंबईची फलंदाजी भक्कम

स्मिथ म्हणाला, मुंबई इंडियन्सकडे एकापेक्षा एक अव्वल दर्जाचे फलंदाज आहेत. रोहित सध्या फॉर्मसाठी झगडतोय, पण इशान किशनच्या बॅटमधून छान धावा निघत आहेत. सूर्यकुमार यादवकडूनही जबरदस्त फलंदाजी होत आहे. डीवाल्ड ब्रेवीससारखा युवा गुणवत्ताप्रधान फलंदाज या संघात आहे. कायरॉन पोलार्ड सर्वोत्तम फिनिशर आहे. म्हणजेच मुंबई इंडियन्सची फलंदाजी भक्कम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com