Ahaan Sharma viral video : रोहित शर्माचा मुलगा अहान आणि मुलगी समायरा यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत दोघेही मस्ती करताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ मुंबई इंडियन्सच्या सामन्यादरम्यानचा असून रोहित शर्माच्या लेकाची पहिली झलक बघून अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. रोहित शर्माचा लेक अगदी लहान असताना त्याची मुलगी समायरा जशी दिसायची अगदी तसाच दिसतो आहे.