
Rohit Sharma Taking Photo of Teammates and Talking in Marathi: मुंबई इंडियन्स संघ गुजरात टायटन्स विरूद्ध आज अहमदाबादमध्ये आयपीएलमधील दुसरा सामना खेळणार आहे. दोन्ही संघानी स्पर्धेतील पहिला गमावला आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये आज पहिल्या विजयासाठी संघर्ष पाहायला मिळणार आहे. सामन्यापूर्वी रोहितचा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवरील व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रोहित शर्मा गुजरातमधील सहकाऱ्यांसोबत मराठीमध्ये संवाद साधताना दिसत आहे.