
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत मुंबई इंडियन्सने रविवारी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ९ विकेट्सने विजय मिळवला. मुंबई इंडियन्सच्या या विजयात रोहित शर्माने मोलाचा वाटा उचलला.
त्याने अर्धशतकी खेळी केली, त्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला. पण यानंतर त्याने सोमवारी इंस्टाग्राम या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेली स्टोरी चर्चेचा विषय ठरली.