
Rohit Sharma, Tilak Varma and Surya Kumar Yadav Funny Video Viral: इंडियन प्रिमिअर लीगच्या १८ व्या हंगामातील पहिला सामना मुंबई इंडियन्सने गमावला. चेन्नई सुपर किंग्जविरूद्धच्या सामन्यात मुंबईला ४ विकेट्ने पराभव स्वीकारावा लागला. आता मुंबई इंडियन्स संघ हंगामातील दुसरा सामना गुजरात टायटन्स विरूद्ध खेळणार आहे. पण अहमदाबादमध्ये दाखल झालेला मुंबई संघ एकदम रिलॅक्स दिसत आहे. मुंबई संघातील खेळाडूंचे एन्जॉय करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.