Rohit Sharma Stand Ticket Goes Viral: इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना प्ले ऑफच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे. मुंबई इंडियन्सने बाजी मारल्यास त्यांचे प्ले ऑफमधील स्थान जवळजवळ निश्चित होईल, पण या सामन्यावर पावसाचे सावट असल्याने दोन्ही संघांची चिंता वाढली आहे. हे गणित सोडल्यास आजचा हा सामना आणखी एका कारणासाठी महत्त्वाचा आहे, कारण त्यात भावना गुंतलेल्या आहेत. भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा प्रथमच त्याच्या नावाचं स्टँडसमोर खेळणार आहे.