RCB vs RR IPL 2023 : शेटवच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात आरसीबीने दिली राजस्थानला मात

RCB vs RR IPL 2023
RCB vs RR IPL 2023esakal

RCB vs RR IPL 2023 : दोन रॉयल्समधील शेवटच्या षटकापर्यंत उत्कंठा ताणून धरलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बेंगलोरने राजस्थान रॉयल्सचा 7 धावांनी पराभव केला. आरसीबीचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल अखेर आजच्या सामन्यात चमकला. त्याने 4 षटकात 33 धावा देत 3 बळी टिपले. तर राजस्थानकडून देवदत्त पडिक्कलने सर्वाधिक 53 धावा केल्या. तर जुरेलने 16 चेंडूत 34 धावा करत शेवटपर्यंत झुंज दिली.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या रॉयल चॅलेंजर बेंगलोरने खराब सुरूवातीनंतर 15 षटकात 156 धावांपर्यंत मजल मारली होती. त्याचवेळी आरसीबी 200 पार धावसंख्या उभारेल असे वाटत होते. मात्र राजस्थान रॉयल्सने शेवटच्या 5 षटकात आरसीबीचे 4 फलंदाज बाद करत त्यांना 189 धावात रोखले.

आरसीबीकडून फाफ ड्युप्लेसिस (62) आणि ग्लेन मॅक्सवेल (77) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 127 धावांची भागीदारी रचली. राजस्तानकडून ट्रेंट बोल्ट आणि संदीप शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या तर यशस्वी जैसवालने दोन धावबाद केले. आजच्या सामन्यात आरसीबीचे तीन फलंदाज धावबाद झाले.

125-4 :RCB चे जोरदार पुनरागमन 

देवदत्त पडिक्कल बाद झाल्यानंतर 37 चेंडूत 47 धावा करणारा यशस्वी जैसवाल देखील बाद झाला. त्याची शिकार हर्षल पटेलने केली. पाठोपाठ संजू सॅमसन देखील 22 धावा करून माघारी परतला. त्यालाही हर्षल पटेलनेच बाद केले. पाठोपाठ दोन विकेट पडल्याने राजस्थानची धावगती मंदावली.

99-2 : पडिक्कलचे अर्धशतक मात्र..

पहिल्या 10 षटकात राजस्थानाल 92 धावांपर्यंत पोहचवल्यानंतर देवदत्त पडिक्कलने आपले अर्धशतक पूर्ण केले. ही जोडी शतकी भागीदारी रचणार असे वाटत असतानाच डेव्हिड विलीने 34 चेंडूत 52 धावा करणाऱ्या पडिक्कलला बाद केले.

92 -1 (10 Ov) : पडिक्कल - जैसवाल जोडी जमली

आरसीबने विजयासाठी ठेवलेल्या 190 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. धडाकेबाज फलंदाज जॉस बटलरला मोहम्मद सिराजने शुन्यावर बाद केले. मात्र त्यानंतर राजस्थानने सावध सुरूवात करत भागीदारी रचण्यावर भर दिला. यशस्वी जैसवाल आणि देवदत्त पडिक्कल यांनी राजस्थानला 10 षटकात 92 धावांपर्यंत मजल मारून दिली.

आरसीबीला राजस्थानने 189 धावात रोखले

163-6 : आरसीबीची मधील फळी गडगडली

चहलने महिपाल लोमरोरला 8 धावांवर बाद केले. तर सुरेश प्रभुदेसाई शुन्यावर धावबाद झाला.

156-4 : अर्धशतक करून ड्युप्लेसिस मॅक्सवेल झाले बाद 

मॅक्सवेलनंतर फाफ ड्युप्लेसिसनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 127 धावांची शतकी भागीदारी रचली. मात्र एक चोरटी धाव घेण्याच्या नादात फाफ ड्युप्लेसिस 62 धावांवर धावबाद झाला. त्यानंतर 44 चेंडूत 77 धावा ठोकणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलला अश्विनने बाद करत आरसीबीला मोठा धक्का दिला.

ड्युप्लेसिस - मॅक्सवेलची आक्रमक भागीदारी

पॉवर प्लेच्या सुरूवातीलाच दोन धक्के बसलेल्या आरसीबीला फाफ ड्युप्लेसिस आणि ग्लने मॅक्सवेल यांनी सावरले. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 80 धावांची भागीदारी रचत संघाला 10 षटकात 101 धावांपर्यंत पोहचवले. आक्रमक मॅक्सनेलने 27 चेंडूत नाबाद अर्धशतक ठोकले. तर ड्युप्लेसिसने देखील 26 चेंडूत 40 धावा करत त्याला चांगली साथ दिली.

12-2 : बोल्टने दिला दुसरा धक्का

आपल्या पहिल्याच षटकात विराट कोहलीला बाद करणाऱ्या बोल्टने दुसऱ्या षटकात शाहबाज अहमदला बाद करत आरसीबीला दुसरा धक्का दिला.

पहिल्याच चेंडूवर विराट झाला बाद 

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सने आरसीबीला पहिल्याच चेंडूवर मोठा धक्का दिला. ट्रेंट बोल्टने कर्णधार विराट कोहलीचा पायचीत बाद केले.

विराट कोहली पुन्हा एकदा कर्णधार

फाफ ड्युप्लेसिस अजूनही फिल्डिंग करण्यासाठी फिट नसल्याने विराट कोहलीच आरसीबीचे नेतृत्व करत आहे.

राजस्थान रॉयर्सने नाणेफेक जिंकली. 

राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com