IPL 2024, Video: पहिल्या विजयानंतर RCB च्या खेळाडूंचा ड्रेसिंग रुममध्ये कल्ला, पाहा कसं केलं सेलिब्रेशन

RCB Dressing Room Video: आयपीएल 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने पहिला विजय मिळवल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये जोरदार जल्लोष केला. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
Virat Kohli | RCB  | IPL 2024
Virat Kohli | RCB | IPL 2024X/RCBTweets

RCB Dressing Room Video: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने सोमवारी (25 मार्च) आयपीएल 2024 स्पर्धेच्या सहाव्या सामन्यात पंजाब किंग्स संघाला 4 विकेट्सने पराभूत केले. हा आयपीएलच्या 17 व्या हंगामातील बेंगळुरूचा पहिलाच विजय ठरला आहे.

त्यातच हा विजय बेंगळुरूने घरच्या मैदानावर म्हणजेच एम चिन्नास्वामी स्टेडियमवर मिळवला. त्यामुळे बेंगळुरूने विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये मोठा जल्लोष केला. याचा व्हिडिओ बेंगळुरूने सोशल मीडियावरही शेअर केला आहे.

'दिनेश कार्तिकची फिनिशिंग, विराटचा मास्टरक्लास, महिपालचा इम्पॅक्ट, सिराजचे वचन आणि यशचे सातत्य - सामन्यांनंतरचा कौतुक सोहळा,' अशा अर्थाचे कॅप्शन बेंगळुरूने व्हिडिओला दिले आहे.

Virat Kohli | RCB  | IPL 2024
Virat Kohli: 'आम्ही भारतात नव्हतो, तर...', दोन महिन्यांची विश्रांती अन् मुलाचा जन्म, अखेर विराट झाला व्यक्त

या व्हिडिओमध्ये सुरुवातीला दिसते की खेळाडू विजयाबद्दल आनंद व्यक्त करत आहेत. त्यानंतर बेंगळुरूचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी संघातील खेळाडूंचे कौतुक केले. त्यांनी मोहम्मद सिराज, यश दयाल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक, विराट कोहली, अनुज रावत अशा बेंगलोर संघातील खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले.

त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी संघातील खेळाडू बेंगळुरू संघाचे गाणे गायले. या व्हिडिओला सध्या चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळताना दिसत आहे.

सोमवारी झालेल्या सामन्यात बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पंजाबने प्रथम फलंदाजी केली होती. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 176 धावा केल्या.

Virat Kohli | RCB  | IPL 2024
Virat Kohli: 'आम्ही भारतात नव्हतो, तर...', दोन महिन्यांची विश्रांती अन् मुलाचा जन्म, अखेर विराट झाला व्यक्त

पंजाबकडून कर्णधार शिखर धवनने सर्वाधिक 45 धावांची खेळी केली, तर जितेश शर्मा, प्रभसिमरन सिंग, सॅम करन आणि शशांक सिंग यांनी छोटेखानी खेळी केल्या. बेंगळुरूकडून मोहम्मद सिराज आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 177 धावांच्या आव्हानाचा पाठलाग बेंगळुरूने 19.2 षटकात 6 विकेट्स गमावून 163 धावा करत पूर्ण केला. बेंगळुरूकडून विराट कोहलीने सर्वाधिक 77 धावांची खेळी केली.

तसेच अखेरीस मोक्याच्या क्षणी दिनेश कार्तिक आणि महिपाल लोमरोर यांनी नाबाद 48 धावांची नाबाद भागीदारी करत बेंगळुरूच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. कार्तिकने 10 चेंडूत नाबाद 28 धावा केल्या, तर महिपाल लोमरोरने 17 धावांची खेळी केली. पंजाबकडून कागिसो रबाडा आणि हरप्रीत ब्रार यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com