IPL 2024 CSK : 'थाला'च्या चेन्नईसमोर मोठा पेच, खतरनाक संघासोबत आता सामना, हरल्यास प्लेऑफमध्ये बाहेर?

आतापर्यंत एकही संघ आयपीएल 2024 मध्ये प्लेऑफसाठी पात्र ठरू शकलेला नाही. दुसरीकडे, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज हे दोन संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.
IPL 2024 Chennai Super Kings Marathi News
IPL 2024 Chennai Super Kings Marathi Newssakal

IPL 2024 CSK Playoffs Chances : आतापर्यंत एकही संघ आयपीएल 2024 मध्ये प्लेऑफसाठी पात्र ठरू शकलेला नाही. दुसरीकडे, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज हे दोन संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.

पॉइंट टेबलबद्दल बोलायचे झाले तर कोलकाता नाईट रायडर्स 11 सामन्यांत 8 विजय आणि 3 पराभवांसह 16 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. याशिवाय राजस्थान रॉयल्स संघ 16 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

IPL 2024 Chennai Super Kings Marathi News
IPL 2024 : 'गंभीर'ची KKR प्ले-ऑफमध्ये मारणार एन्ट्री की पांड्याची MI घालणार खोडा? जाणून घ्या कोणाचे पारडे जड

हे दोन्ही संघ प्लेऑफमध्ये पोहोचणार हे जवळपास निश्चित झाले आहे. याशिवाय प्लेऑफमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर जायंट्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत सुरू आहे. गुजरात टायटन्सने ५९व्या सामन्यात सीएसकेचा पराभव करून प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या.

IPL 2024 Chennai Super Kings Marathi News
MS Dhoni Fan : धोनीचा क्रेझी फॅन अचानक घुसला मैदानात... धरले ‘थला’चे पाय अन् पुढे...; व्हिडिओ व्हायरल

आयपीएल प्लेऑफमधील आपल्या आशा बळकट करण्यासाठी रविवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला कोणत्याही किंमतीवर विजय मिळवावा लागेल. यासोबत चेन्नई सुपर किंग्सचा शेवटचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध असणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघ सध्या 12 सामन्यांत 12 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. शुक्रवारी गुजरात टायटन्सविरुद्धच्या पराभवामुळे त्यांच्यावर अतिरिक्त दडपण वाढले असून आता त्यांना उर्वरित दोन्ही सामने जिंकण्याची गरज आहे.

दुसरीकडे, रॉयल्सचे 16 गुण आहेत आणि ते दुसऱ्या स्थानावर आहेत, परंतु मागील दोन सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पराभवामुळे त्यांचे मनोबल घसरले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com