
Fan Girl Reaction Viral after MS Dhoni Wicket : काल, गुवाहटी येथील सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा ६ धावांनी पराभव केला. राजस्थानने आयपीएलच्या १८ व्या हंगामात काल पहिला विजय मिळवला. तर चेन्नई सुपर किंग्जला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. बंगळूरूविरूद्ध सामन्यात ९ व्या स्थानावर फलंदाजीसाठी आल्यामुळे ट्रोल झालेला एमएस धोनी यावेळी तो ७ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. पण संदीप शर्माने त्याला अवघ्या १६ धावांवर माघारी पाठवले. धोनीचा शिमरॉन हेटमायरने पकडलेला अप्रतिम झेल पाहून एका चाहतीने अशी प्रतिक्रिया दिली की, सर्वच पाहात राहिले.