Ruturaj Gaikwad CSK vs LSG : आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं, धोनीला जमलं नाही ते ऋुतूनं करून दाखवलं

Ruturaj Gaikwad CSK vs LSG
Ruturaj Gaikwad CSK vs LSGesakal

Ruturaj Gaikwad Become Chennai Super Kings Captain First Who Scored Hundred In IPL : आयपीएलच्या 39 व्या सामन्यात आज चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधरा ऋतुराज गायकवाड पुन्हा एकदा सलामीला खेळण्यासाठी उतरला. लखनौ सुपर जायंट्सविरूद्धच्या सामन्यात त्यानं सलामीला येत 56 चेंडूत शतक ठोकलं.

त्याच्या या शतकी खेळीमुळं चेन्नईनं लखनौविरूद्ध 200 धावांचा टप्पा पार केला. या शतकाबरोबरच ऋतुराज गायकवाडने सीएसकेचा कर्णधार म्हणून एक मोठा विक्रम देखील आपल्या नावावर केला.

Ruturaj Gaikwad CSK vs LSG
Sunil Narine KKR Salary : सुनिल - केकेआर नातं एक तपाचं; विश्वासाचं अन् 113 कोटींच!

ऋतुराज गायकवाडने 56 चेंडूत शतकी खेळी केली. आयपीएलमधील ही त्यांची दुसरी शतकी खेळी आहे. मात्र चेन्नईचा कर्णधार म्हणून ही त्याची पहिलीच शतकी खेळी आहे. या शतकाबरोबरच ऋतुराज गायकवाडनं आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारांना जे जमलं नाही ते करून दाखवलं.

ऋतुराज हा चेन्नई सुपर किंग्जचा शतकी खेळी करणारा पहिला कर्णधार ठरला आहे. यापूर्वी स्टिफन फ्लेमिंग आणि महेंद्रसिंह धोनीला देखील असा कारनामा करता आला नव्हता.

Ruturaj Gaikwad CSK vs LSG
Dwayne Bravo: पाथिराना, मुस्तफिजूरला कोचिंग का करत नाही? CSK चा कोच ब्रावोने सांगितलं वैशिष्ट; यॉर्करबद्दलही केलं मोठं भाष्य

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर नाणेफेक जिंकून लखनौ सुपर जायंट्सने प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला. सीएसकेने रचिन रविंद्रच्या ऐवजी डॅरेल मिचेलला संघात स्थान दिलं. ऋतुराज सलामीला आला. मात्र दुसरा सलामीवीर अजिंक्य रहाणे स्वस्तात माघारी गेला. पाठोपाठ मिचेल देखील परतला.

दरम्यान आक्रमक फंलदाजी करणाऱ्या ऋतुराजनं पॉवर प्लेमध्ये सीएसकेला अर्धशतकी मजल मारून दिली. त्यानंतर रविंद्र जडेजासोबत ऋतुराजनं मोठी भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र जडेजाने 16 धावा करत ऋतुराजची साथ सोडली.

चेन्नईचं शतक पार झाल्यावर आलेल्या शिवम दुबेने शेवटच्या पाच षटकात तुफान फटकेबाजी केली. दरम्यान, ऋतुराज अर्धशतकानंतर आता शतकाच्या जवळ पोहचला होता. त्यानं 56 चेंडूत शतक पूर्ण केलं. त्यानंतर शिवम दुबेने आपले अर्धशतक पूर्ण करत संघाला 200 धावांचा टप्पा देखील पार करून दिला.

मात्र शेवटचा चेंडू धोनीला खेळण्यासाठी सोडला अन् तो धावबाद झाला. धोनीनंही चाहत्यांचे पैसे वसूल करून दिले. त्यानं चौकार मारत चेपॉकच्या चाहत्यांच मन राखलं.

(IPL 2024 Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com