
Sachin Tendulkar Tweets on Arjun Tendulkar : आयपीएल 2023चा 22वा सामना रविवारी वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात यजमान मुंबई संघाने 5 गडी राखून विजय मिळवला. तेंडुलकर कुटुंबासाठी हा सामना सर्वात संस्मरणीय आणि खास होता.
कारण बऱ्याच दिवसांपासून पदार्पणाची वाट पाहणाऱ्या अर्जुन तेंडुलकरला अखेर कोलकाताविरुद्ध पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली. या क्षणाची केवळ तेंडुलकर कुटुंबच नव्हे तर संपूर्ण भारत वाट पाहत होता. त्याचवेळी मुलगा अर्जुनचा पहिला आयपीएल सामना खेळल्यानंतर सचिन तेंडुलकरनेही मोठे वक्तव्य केले आहे.
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमधील पहिला सामना खेळण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. तो 2021 पासून मुंबई इंडियनच्या कॅम्प मध्ये आहे. पण आता त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली. याचा अर्थ अर्जुनने ही एमआय कॅप त्याच्या वडिलांकडून नाही तर स्वत:च्या बळावर मिळवली आहे.
मुलाच्या पदार्पणानंतर सचिनने ट्विट केले की, 'अर्जुन, आज तू क्रिकेटपटू म्हणून तुझ्या प्रवासात आणखी एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहेस. तुझ्यावर प्रेम करणारा आणि खेळाची आवड असणारा पिता या नात्याने, मला माहीत आहे की तू खेळाला पुढेही देत राहशील आणि खेळ तुझ्यावर देखील प्रेम करत राहील.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने ट्विटरवर आणखी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये मास्टर ब्लास्टरने अर्जुनने या टप्प्यावर पोहोचण्यासाठी किती मेहनत घेतली आहे याचाही उल्लेख केला आहे.
सचिन म्हणाला, 'इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि मला खात्री आहे की तो हे करत राहिल. एका सुंदर प्रवासाची ही सुरुवात आहे. माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा. 23 वर्षीय अर्जुनने पदार्पणाच्या सामन्यात 17 धावा देत दोन षटके टाकली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.