Sai Sudarshan GT vs CSK : साई सुदर्शनने केला मोठा विक्रम; सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागं

Sai Sudarshan GT vs CSK
Sai Sudarshan GT vs CSK esakal

Sai Sudharsan Fastest Indian to complete 1000 runs in IPL history : गुजरात टायटन्सचा सलामीवीर साई सुदर्शनने चेन्नई सुपर किंग्जविरूद्ध धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने शतक ठोकत कर्णधार शुभमन गिल सोबत 200 धावांची नाबाद द्विशतकी सलामी दिली. दरम्यान, साईने आयपीएलमधील आपल्या 1000 धावा देखील पूर्ण केल्या. त्यानं या 1000 धावा पूर्ण करताना एक मोठा विक्रम केला अन् सचिन तेंडुलकरला मागं टाकलं.

Sai Sudarshan GT vs CSK
IPL 2024: जड्डूनं 'तो' विजयी चौकार पुन्हा ठोकला अन् चेन्नईकरांच्या गेल्या वर्षीच्या आठवणी ताज्या झाल्या

आयपीएल इतिहासात सर्वात वेगवान 1000 धावा करण्याचा विक्रम यापूर्वी सचिन तेंडुलकरच्या नावार होता. त्यानं 31 डावात आयपीएलमध्ये 1000 धावांचा टप्पा पार केला होता. आता साई सुदर्शनने 25 डावात आयपीएलमधील आपल्या 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला.

आयपीएलमध्ये सर्वात वेगवान 1000 धावा पूर्ण करणारे खेळाडू

  • साई सुदर्शन - 25 डावात 1000 धावा पूर्ण

  • सचिन तेंडुलकर - 31 डावात 1000 धावा पूर्ण

  • ऋतुराज गायकवाड - 31 डावात 1000 धावा पूर्ण

Sai Sudarshan GT vs CSK
Team India Coach: द्रविड सोडणार टीम इंडियाचे प्रशिक्षकपद? BCCI नव्या गुरुच्या शोधात, जय शाह यांचा मोठा खुलासा

साई सुदर्शन आणि शुभमन गिल या दोघांनी आज शतकी खेळी केली. त्याचबरोबर त्यांनी 210 धावांची द्विशतकी सलामी देखील दिली. ही आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या सलामी भागीदारीच्या विक्रमाची बरोबरी करणारी ठरली.

यापूर्वी 2022 मध्ये क्विंटन डिकॉक आणि केएल राहुल यांनी लखनौ सुपर जायंट्ससाठी 210 धावांची सलामी दिली होती. आता साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी देखील 210 धावा करत या विक्रमाची बरोबरी केली आहे. साई सुदर्शनने 103 धावांची तर शुभमन गिलने 104 धावांची शतकी खेळी केली. या दोघांनाही तुषार देशपांडेने 18 व्या षटकात बाद केलं.

(IPL 2024 Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com