Team India Coach: द्रविड सोडणार टीम इंडियाचे प्रशिक्षकपद? BCCI नव्या गुरुच्या शोधात, जय शाह यांचा मोठा खुलासा

Indian Cricket Coach: भारतीय संघाला जूननंतर नवा प्रशिक्षक मिळण्याची दाट शक्यता आहे, याबाबत जय शाह यांनी मोठा खुलासा केला आहे.
Rahul Dravid | Jay Shah | Team India
Rahul Dravid | Jay Shah | Team IndiaSakal

India Cricket Team Coach: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) नवीन प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागवणार असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीच मोठा खुलासा केला आहे.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार जय शाह यांनी बुधवारी सांगितले आहे की बीसीसीआय लवकरच भारतीय संघाच्या नव्या प्रशिक्षकासाठी जाहिरात प्रकाशित करणार आहे. त्यामुळे आता भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

द्रविडने 2021 च्या अखेरीस भारतीय संघाचे प्रशिक्षकपद स्विकारले होते. तेव्हापासून तो भारताचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे.

Rahul Dravid | Jay Shah | Team India
IPL 2024: अ‍ॅक्शन तशी रिअ‍ॅक्शन! रुसोच्या गोळीबार सेलिब्रेशनला विराटकडून कडकडीत प्रत्युत्तर, Video व्हायरल

जय शाह यांनी सांगितलं की 'राहुल द्रविडचा कार्यकाळ जूनपर्यंतच आहे. त्यामुळे जर त्याला प्रशिक्षकपदासाठी पुन्हा अर्ज करायचा असेल, तर तो करू शकतो.' तसेच नव्या मुख्य प्रशिक्षकाच्या निवडीनंतर त्याच्याशी चर्चा करून अन्य सहाय्यक प्रशिक्षकांबाबत निर्णय होईल. दरम्यान, जय शाह यांनी परदेशी प्रशिक्षकाचीही नियुक्तीच्या शक्यतेलाही नकार दिलेला नाही.

त्यांनी सांगितले की 'आम्ही नवा प्रशिक्षक भारतीय असावा की परदेशी असावा, हे आम्ही ठरवू शकत नाही. हे क्रिकेट सल्लागार समितीवर अवलंबून आहे. आम्ही एक जागतिक संस्था आहोत.'

तसेच ज्याप्रकारे इंग्लंड आणि पाकिस्तानने वेगवेगळ्या क्रिकेट प्रकारांसाठी वेगवेगळे प्रशिक्षक नेमले आहेत. मात्र ही वेगवेगळ्या प्रशिक्षकांची पद्धत भारतात लागू होणार नसल्याचेही त्यांनी सुचवले आहे.

Rahul Dravid | Jay Shah | Team India
IPL 2024 Playoffs: मुंबईपाठोपाठ पंजाबचंही आव्हान संपलं, आता प्लेऑफची शर्यत 8 संघात; जाणून घ्या समीकरण

त्यांनी म्हटले की 'तो निर्णय देखील क्रिकेट सल्लागार समिती घेईल. पण सर्व प्रकारात खेळणारे अनेक खेळाडू भारतीय संघात आहेत. विराच कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत, असे अनेक खेळाडू आहेत, जे तिन्ही प्रकारात खेळतात. त्यामुळे भारतात असं (वेगवेगळे प्रशिक्षक) होण्याची शक्यता फार कमी आहे.'

याशिवाय शाह यांनी स्पष्ट केले की नव्या प्रशिक्षकांची नियुक्ती मोठ्या कालावधीसाठी केली जाणार आहे. सुरुवातीचा करार तीन वर्षांचा असेल.

दरम्यान, भारतीय संघाला जूनमध्ये टी20 वर्ल्ड कप खेळायचा आहे. या स्पर्धेदरम्यान द्रविडच भारताचा मुख्य प्रशिक्षक आहे. पण त्यानंतर त्याचा कार्यकाळ संपणार असून आता भारताला नवा प्रशिक्षक लाभणार हे पाहाणे औत्सुक्याचे असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com