Sam Curran Toss PBKS vs MI : काय भरोसा खात्री केलेली बरी... सॅम करनच्या कृतीनं मुंबई इंडियन्सभोवती वाढले संशयाचे ढग?

Sam Curran
Sam Curran Toss PBKS vs MIesakal

Sam Curran Check Toss Coin PBKS vs MI : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात टॉस टॅम्परिंगचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यातील सामन्यात नाणेफेकीचा निकाल बदलण्यात आला असा आरोप अनेक चाहत्यांनी केला होता. अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते.

आज पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम करननं मुंबई इंडियन्सविरूद्धच्या सामन्यावेळी अशी कृती केली की त्यामुळे मुंबई इंडियन्स आणि आयपीएल मॅच रेफ्रींविरूद्ध अविश्वाचं वातावरण आहे की काय अशी शंका उपस्थित झाली.

Sam Curran
PBKS vs MI Live Cricket Score : सूर्याची खेळी सॅमनं संपवली; मुंबईला तिसरा धक्का

शिखर धवनच्या अनुपस्थितीत सॅम करन हा पंजाब किंग्जचे काळजीवाहू कर्णधारपद भूषवत आहे. त्याने मुंबई विरूद्धच्या सामन्यात नाणेफेकीवेळी स्मार्मनेस दाखवला. त्यानं नाणं टॉस केल्यानंतर पुढे येत निर्णय योग्य आहे की नाही याची खातरजमा करून घेतली. कॅमेरामनने देखील नाण्यावर झूम करत चाहत्यांना स्पष्ट चित्र दाखवण्याचा प्रयत्न केला.

आरसीबीविरूद्धच्या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सवर टॉसमध्ये गोलमाल करत असल्याचा आरोप चाहत्यांनी लावला होता. आता पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम करनचे मॅच रेफ्रीवर विश्वास न ठेवता स्वतः नाणेफेकीचा कौल क्रॉस चेक करण्यानं अजूनही मुंबई इंडियन्स किंवा आयपीएलच्या मॅच रेफ्रींविरूद्ध अविश्वासाचं वातावरण असल्याचं अधोरेखित होत आहे.

Sam Curran
MS Dhoni LSG vs CSK : धोनीनं शेवटच्या चेंडूवर षटकार मारावा मात्र... लखनौची चेन्नईच्या थलाविरूद्ध पोस्टरबाजी

पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र मुंबईचे फलंदाज रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी दुसऱ्या विकेटसाठी 81 धावांची धडाकेबाज भागीदारी रचत मुंबईच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.

(IPL 2024 Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com