जसप्रीत बुमराहचा मुलगा अंगदच्या चेहऱ्यावरील हावभावावरून नेटकऱ्यांनी त्याची थट्टा उडवली होती. काहींनी यावेळी ‘ट्रॉमा’ आणि 'डिप्रेशन’ सारख्या शब्दांचा वापर केला होता. दरम्यान, अंगदला ट्रोल करणाऱ्यांना आता जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशने चांगलेच सुनावलं आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट करत तिने यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.