esakal | अश्विनसारख्या माणसाला कधीच संघात घेणार नाही- संजय मांजरेकर
sakal

बोलून बातमी शोधा

Ashwin-Sanjay-Manjrekar

वाचा, मांजरेकर यांच्या या विधानामागचं कारण...

अश्विनसारख्या माणसाला कधीच संघात घेणार नाही- संजय मांजरेकर

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 DC vs KKR: शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात कोलकाताने दिल्लीच्या संघावर ३ गडी राखून विजय मिळवला. दिल्लीचा प्रवास पराभवासह संपुष्टात आला तर कोलकाताने चेन्नईविरूद्ध फायनलचं तिकीट मिळवलं. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना १३५ धावा केल्या होत्या. कोलकाताने हे आव्हाना शेवटच्या षटकात पूर्ण केले. सामन्यात अश्विनने शेवटचे षटक टाकताना दोन बळी टिपले पण एका चुकीच्या चेंडूवर षटकार खात त्याच्या संघाला पराभूत व्हावे लागले. त्यानंतर, अश्विनसारख्या माणसाला संघात अजिबात स्थान देणार नाही, असं रोखठोक मत मुंबईकर माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा: 'ग्लॅमरस IPL' ... मॅचपेक्षाही 'या' तरूणींच्या अदांचीच चर्चा!

"अश्विनबद्दल आपण गेली अनेक वर्षे चर्चा करत आहोत. अश्विन टी२० मध्ये फासरा प्रभावी गोलंदाज नाही हे माझं स्पष्ट मत आहे. तुम्ही अश्विनला काही सल्ला दिलात तरी तो बदलणार नाही. कारण गेल्या ५-७ वर्षात तो त्याच त्याच गोष्टी करताना दिसत आहे. कसोटी सामन्यांमध्ये अश्विनवर अवलंबून राहणं समजू शकतो पण टी२० क्रिकेटमध्ये अश्विन हा फारसा चांगला पर्याय नाही. गेल्या पाच वर्षात अश्विन एकसारखीच गोलंदाजी करताना दिसतोय. त्यामुळे मला जर फिरकीला मदत करणारं पिच मिळालं तर मी वरूण चक्रवर्ती, सुनील नारायण किंवा युजवेंद्र चहलला संघात घेईन. पण अश्विनसारख्या माणसाला संघात अजिबात घेणार नाही", असं सडेतोड मत अश्विनने व्यक्त केलं.

हेही वाचा: Video: युवा शिवम मावीने उडवला अनुभवी स्टॉयनीसचा त्रिफळा

दरम्यान, दिल्लीविरूद्धच्या सामन्यात कोलकाताकडून सलामीवीर व्यंकटेश अय्यर आणि शुबमन गिल या दोघांनीही दमदार कामगिरी केली. व्यंकटेश अय्यरने ५५ धावांची खेळी केली. त्यात ४ चौकार आणि ३ षटकार समाविष्ट होते. गिलला अर्धशतकाने हुलकावणी दिली. त्याने ४६ चेंडूत ४६ धावा केल्या. या दोघांच्या विकेटनंतर सामना विचित्र प्रकारे फिरला. नितीश राणा १३ धावांवर बाद झाल्यानंतर दिनेश कार्तिक, इयॉन मॉर्गन, शाकीब अल हसन आणि सुनील नारायण हे चौघे भोपळाही फोडू शकले नाहीत. पण अखेर राहुल त्रिपाठीने मोक्याच्या क्षणी षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला.

loading image
go to top