
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचा आता पहिला टप्पा संपला असून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यावेळी अनेक संघांना खेळाडूंच्या दुखापतीचा सामना करावा लागला आहे. राजस्थान रॉयल्सदेखील यातीलच एक संघ आहे.
राजस्थान रॉयल्ससाठी आयपीएलचा चालू हंगाम फारसा चांगला ठरलेला नाही. त्यांना ८ पैकी २ सामनेच जिंकता आले आहेत. त्यामुळे त्यांचे ४ गुणच अद्याप आहेत. आता त्यांना ९ वा सामना २४ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळायचा आहे. पण त्यांना एक मोठा धक्का बसला आहे. या सामन्यात राजस्थानचा नियमित कर्णधार संजू सॅमसन खेळणार नसल्याचे राजस्थानने स्पष्ट केले आहे.