Dunes League T20 : क्रिकेटच्या कक्षा रुंदावतायेत! सौदी अरेबिया फ्रँचायझी लीगच्या मैदानात; युवराज सिंग ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

Saudi Arabia Cricket League : जगभरातील विविध टी-२० लीगच्या प्रवाहात आता सौदी अरेबियानेही 'ड्यून्स लीग'द्वारे क्रिकेट क्षेत्रात पाऊल ठेवले असून, ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत निवृत्त आंतरराष्ट्रीय आणि सक्रिय फ्रँचायझी खेळाडूंचा तगडा भरणा पाहायला मिळणार आहे.
Saudi Arabia Cricket League

Saudi Arabia Cricket League

esakal

Updated on

इंडियन प्रीमिअर लीग, बिग बॅश लीग, कॅरेबियन प्रीमिअर लीग... आदी जगभरात अनेक लीग सुरू असताना क्रिकेटचा कोणताही इतिहास नसलेल्या सौदी अरेबियामध्ये नवीन फ्रँचायझी लीग सुरू होत आहे. सौदी अरेबियात ‘Dunes League T20’ स्पर्धा सुरू होणार आहे. ही लीग ऑक्टोबरमध्ये खेळवली जाणार असून, तिला सौदी अरेबिया क्रिकेट फेडरेशनची मान्यता मिळाली आहे. या लीगमध्ये निवृत्त आंतरराष्ट्रीय खेळाडू तसेच सध्या फ्रँचायझी क्रिकेट खेळणारे खेळाडू सहभागी होणार आहेत.

मागील पाच वर्षांत सौदी अरेबियाने क्रीडा क्षेत्रात मोठे पाऊल टाकले आहे. तेलसंपन्न असलेला हा देश आता विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनी फुटबॉल, टेनिस आणि बॉक्सिंगसारख्या स्पर्धांचे आयोजन केले आहे. आता ते क्रिकेटमध्येही जोरदार एंट्री घेत आहेत. देशात पहिल्यांदाच ‘Dunes League T20’ चे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले, पण सध्या फ्रँचायझी क्रिकेटमध्ये सक्रिय असलेल्या खेळाडूंचा यात समावेश असणार आहे. IPL ला टक्कर देण्यासाठी सौदी अरेबिया स्वतःची लीग सुरू करणार असल्याच्या अनेक अफवा समोर आल्या होत्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com