
Shardul Thakur likely to join LSG squad: भारतीय अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरला IPL 2025 मध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. मागच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळलेला शार्दुल ठाकूर हा वर्षीच्या लिलावात अनसोल्ड राहिला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनिय कामगिरीनंतरही त्याच्यावर कोणत्याच फ्रॅंचायझीने विश्वास दाखवला नाही. पण आयपीएलच्या १८ व्या हंगामाला सुरूवात होण्यास अवघा एक दिवस शिल्लक असताना शार्दुलने आयीपएलमध्ये एन्ट्री केल्याचे समजत आहे.