
केकेआर IPL मधून बाहेर तरीही अय्यर...! धक्कादायक उत्तर
KKR IPL 2022: कोलकाता नाइट रायडर्सला कालच्या आयपीएल सामन्यात लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध 2 धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवासह कोलकाता नाईट रायडर्स आयपीएलमधून बाहेर पडली आहे. केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर आयपीएल 2022 मधून संघ बाहेर पडल्यानंतर अजिबात दुःख झाले नाही. (KKR Out Of IPL Shreyas Iyer)
कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल मधून बाहेर पडल्यानंतर श्रेयस अय्यरने धक्कादायक विधान केले आहे. तो म्हणाला, मला अजिबात दु:ख होता नाही. उलट या संपूर्ण आयपीएल हंगामात कालचा लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धचा सामना सर्वात सर्वोत्तम होता. आम्ही ज्या पद्धतीने मैदानावर आमची गेम झाली, आणि खेळाडू वृत्ती देखील उत्कृष्ट होती.
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्स संघाने क्विंटन डी कॉकच्या 140 धावांच्या खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्ससमोर 211 धावांचे लक्ष्य ठेवले होते. रिंकू सिंगने कोलकाता नाईट रायडर्सला विजय मिळवून देण्याचा खूप प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला. या लक्ष्यापासून कोलकाता नाईट रायडर्सचा संघ 2 धावा दूर राहिला. रिंकू सिंगने 15 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांसह 40 धावा केल्या.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली, कोलकाता नाइट रायडर्सने यावर्षी 14 पैकी 6 सामने जिंकले, तर 8 सामने हारले. श्रेयस अय्यर म्हणाला, आम्ही आयपीएल 2022 मध्ये चांगली सुरुवात केली, पण आम्ही सलग पाच सामने हारले, पण मला आनंद आहे की आम्हाला रिंकूसारखे खेळाडूही मिळाले.