Punjab Kings: 'थँक यू!', ऐतिहासिक विजयानंतर पंजाबच्या 'या' खेळाडूने अचानक सोडली संघाची साथ, कारणही आलं समोर

IPL 2024: पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर त्यांच्या संघातील एक खेळाडू आयपीएलच्या 17 व्या हंगामातून बाहेर झाला आहे.
Punjab Kings
Punjab KingsSakal

Punjab Kings News: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत शुक्रवारी (26 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात सामना झाला. ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात पंजाब किंग्सने 8 विकेट्सने विजय मिळवला. हा विजय पंजाबसाठी ऐतिहासिक ठरला.

आयपीएलमध्येच नाही, तर टी20 क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना मिळवलेला हा सर्वात मोठा विजय आहे. या सामन्यात कोलकाताने दिलेलं 262 धावांचं लक्ष्य पंजाबने अवघ्या १९ व्या षटकातच पूर्ण केलं.

Punjab Kings
MS Dhoni Cyber Scam : 'मी वावरात आहे, पाकीट घरी विसरलोय, 600 रूपये पाठव...' धोनीचा मेसेज आला असेल तर सावधान! Scam Alert

दरम्यान, हा ऐतिहासिक विजय मिळवला असला, तरी पंजाबला एक धक्काही बसला आहे. त्यांचा अष्टपैलू क्रिकेटपटू सिकंदर रझाने संघाची साथ सोडली असून तो आपल्या राष्ट्रीय संघाप्रती असलेली वचनबद्धता पाळण्यासाठी परतला आहे.

येत्या 3 मे पासून झिम्बाब्वे संघाला बांगलादेश दौरा करायचा आहे, या दौऱ्यात 5 टी20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. त्याचसाठी झिम्बाब्वे संघातील प्रमुख खेळाडू असलेला सिकंदर रझा आयपीएलच्या 17 व्या हंगामातून आता बाहेर झाला आहे. सिकंदर रझा केवळ झिम्बावेचा प्रमुख खेळाडूच नाही, तर टी20 संघाचा कर्णधारही आहे.

Punjab Kings
Gautam Gambhir: एका रनासाठी गौतम झाला 'गंभीर', थेट अंपायरवर भडकला अन्...; कोलकाता-पंजाब मॅचमध्ये नेमकं काय घडलं?

आयपीएल 2024 मधून बाहेर झाल्यानंतर सिकंदर रझाने खास पोस्टही शेअर केली आहे. त्याने लिहिलं की 'भारत, आयपीएल आणि पंजाब किंग्स माझ्या आदरातिथ्याबद्दल आभार. मी प्रत्येक मिनिटाचा आनंद घेतला. आता राष्ट्रीय ड्युटीची वेळ आहे. आपण लवकरच भेटू.'

दरम्यान, आयपीएल 2024 मधील सिकंदर रझाच्या कामगिरीबद्दल सांगायचं झालं, तर त्याला 2 सामनेच खेळण्याची संधी मिळाली. यात त्याने 43 धावा केल्या, तसेच 2 षटके गोलंदाजी केली, ज्यात त्याला एकही विकेट मिळाली नाही.

रझाने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये एकूण ९ सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 182 धावा केल्यात आणि 3 विकेट्स घेतल्या होत्या.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com