Sourav Ganguly | 'प्रत्येकजण माणूसच आहे; चुका होणारच'

Sourav Ganguly Statement About Rohit Sharma Virat Kohli
Sourav Ganguly Statement About Rohit Sharma Virat Kohli ESAKAL

कोलकाता : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात भारतीय संघातील दोन स्टार फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना लौकिकास साजेसा खेळ करता आला नाही. रोहितने 14 सामन्यात 19.14 च्या सरासरीने 268 धावा केल्या. दरम्यान, या दोन फलंदाजांच्या खराब कामगिरीवर बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलीने आपली प्रतिक्रिया दिली. (Sourav Ganguly Statement About Rohit Sharma Virat Kohli Form In IPL 2022)

Sourav Ganguly Statement About Rohit Sharma Virat Kohli
Video : हार्दिक पांड्या घसरला; सामनाही हातून निसटणार?

गांगुली म्हणाला की, 'प्रत्येकजण माणूसच आहे, चुका होणारच मात्र कर्णधार म्हणून रोहितचे रेकॉर्ड चांगले आहे. पाचवेळा आयपीएल विजेतेपद, आशिया कप विजेता, त्याने ज्या स्पर्धेत कर्णधारपद भूषवले आहे तिथे विजय मिळवला आहे. कर्णधार म्हणून त्याचे रेकॉर्ड चांगले आहे. त्याच्याकडूनही चुका होणार कारण तोही माणूसच आहे.'

विराटबाबत बोलताना गांगुली म्हणाला की, 'तो एक चांगला खेळाडू आहे. मला असे वाटते की तो पुन्हा धावा करण्यास सुरूवात करेल. तो खूप जास्त क्रिकेट खेळत आहे त्यामुळे त्यााच फॉर्म हरपला असावा. कोहलीने गेल्या सामन्यात चांगली फलंदाजी केली. ज्यावेळी आरसीबीला गरज होती त्यावेळी त्यांनी आपला खेळ उंचावला.'

Sourav Ganguly Statement About Rohit Sharma Virat Kohli
सचिनचा अर्जुला सल्ला; मार्ग खडतर असणार!

याचबरोबर सौरभने उमरान मलिक, राहुल त्रिपाठी आणि तिलक वर्माबद्दल देखील आपले मत व्यक्त केले. तो उमरानबद्दल म्हणाला की, 'त्याचे भविष्य त्याच्याच हातात आहे. तर जो फिट राहिला आणि याच गतीने गोलंदाजी करत राहिला तर मला विश्वास आहे की तो मोठ्या काळासाठी भारतीय संघात राहू शकतो.' राहुल त्रिपाठी आणि तिलक वर्माबद्दल सौरभने 'यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक खेळाडूंनी आपली प्रतिभा दाखवली. तिलक वर्माने मुंबईसाठी चांगली कामगिरी केली. राहुल त्रिपाठीने सनराईजर्सकडून दमदार कामगिरी केली. राहुल तेवतिया गुजरातकडून चांगली कामगिरी करत आहे. याचबरोबर मोहसीन खान, अर्शदीप सिंह, आवेश खान यासारख्या तरूण वेगावान गोलंदाजांनी प्रभावित केले. आयपीएल एक अशी जागा आहे जिथे गुणवान खेळाडूंना चांगली संधी मिळते.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com