IPL स्पॉट फिक्सिंग...10 लाख; श्रीशांतने केले धक्कादायक खुलासे

IPL स्पॉट फिक्सिंग...10 लाख; श्रीशांतने केले धक्कादायक खुलासे

श्रीशांतने आयपीएलमध्ये राज्यस्थान संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं.

Sreesanth Reveals Shocking Details Behind IPL Spot-Fixing : आयपीएल स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली तुरूंगवास भोगलेला भारतीय संघाचा गोलंदाज एस. श्रीशांत याने एका मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. 2013 मध्ये 'इंडियन प्रीमिअर लीग' स्पर्धेतील (आयपीएल) 'स्पॉट फिक्‍सिंग' प्रकरणात दोषी आढळल्यानंतर त्याच्यासह इतर क्रिकेटपटूंवर कारवाई करण्यात आली होती. यावर आता श्रीशांतने मौन सोडलं आहे. 'स्पोर्ट्सकीडा'ला दिलेल्या मुलाखतीत श्रीशांतने आपला पक्ष ठेवला आहे. 10 लाख रुपयांसाठी मी फिक्सिंग कशाला करु असा सवाल श्रीशांत याने उपस्थित केला. श्रीशांतने आयपीएलमध्ये राज्यस्थान संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं.

श्रीशांत म्हणाला की, 'ईरानी चषक खेळला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकासोबत मालिका खेळण्याची इच्छा होती. कारण सप्टेंबर 2013 मध्ये जिंकू. ती मालिका खेळण्याचं माझं लक्ष होतं. दहा लाख रुपयांसाठी मी फिक्सिंग का करु? एखादी पार्टी केली तरी माझं बिल दोन लाख रुपयांपेक्षा जास्त होत होतं. असं असताना फक्त दहा लाख रुपयांसाठी मी फिक्सिंग का करेल?'' चाहते आणि शुभचिंतकांमुळेच मी या सर्वातून बाहेर आल्याचेही श्रीशांतने स्पष्ट केलं.

2013 मध्येही मी सर्व व्यवहार कार्डच्या स्वरुपात करत होतो. रोख रकमेनं व्यवहार जास्तप्रमाणात करत नव्हतो. जर माझ्याकडे इतके पैसे असतील तर वाटत फिरलो असतो, असे श्रीशांत म्हणाला. श्रीशांतनेही असाही दावा केलाय की, 'ज्या षटकांवरुन माझ्या आरोप लावले त्या षटकात प्रतिस्पर्धी संघाला विजयासाठी 14 पेक्षा जास्त धावांची गरज होती. पहिल्या चार चेंडूत मी फक्त चार धावा दिल्या होत्या. यामध्ये नो बॉल, वाईड बॉल अथवा एकही चेंडू संथ गतीने फेकला नव्हता. माझ्या बोटाची सर्जरी केली असतानाही 130 किलोमीटर वेगानं चेंडू फेकत होतो. '

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com