हैदराबादचा 'वेगवान' कोच डेल स्टेनने घेतली धोनीची स्वाक्षरी | Dale Steyn Took Autograph of MS Dhoni | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dale Steyn Took Autograph of MS Dhoni

हैदराबादचा 'वेगवान' कोच डेल स्टेनने घेतली धोनीची स्वाक्षरी

चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) ऋतुराज गायकवाड (99) आणि डेव्हॉन कॉनवॉय (85) यांनी दिलेल्या 182 धावांच्या सलामीच्या जोरावर सनराईजर्स हैदराबादचा पराभव केला. या सामन्यात एमएस धोनीने (MS Dhoni) सीएसकेचे नेतृत्व केले होते. सीएसकेने आठसामन्यात सहा पराभव पाहिल्यानंतर संघाने हा निर्णय घेतला होता. दरम्यान, सामना झाल्यावर विजयामुळे धोनी रिलॅक्स मोड मध्ये दिला.

हेही वाचा: कर्णधाराला प्रत्येकवेळी 'चमच्यानं भरवणं' शक्य होत नाही : धोनी

दरम्यान सामना झाल्यानंतर धोनी आपल्या चाहत्यांना अभिवादन करत होता. हैदराबादचा गोलंदाजी प्रशिक्षक डेल स्टेन (Dale Steyn) याने चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीची स्वाक्षरी घेतली. डेल स्टेन हा दक्षिण आफ्रिकेचा सर्वात वेगवान गोलंदाज होता. तो एक स्टार होता. तरीही त्याने महेंद्रसिंह धोनीची स्वाक्षरी (Autograph) घेतल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. या दुर्मिळ क्षणाचा फोटो सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाला.

हेही वाचा: रेल्वेत 'क' श्रेणी नोकरी करणाऱ्या इंजिनियरसाठी कसं उघडलं IPLचं दार?

डेल स्टेन सध्या हैदराबादच्या प्रशिक्षकाच्या भुमिकेत आहे. तो मुख्य प्रशिक्षक टॉम मूडी, बॅटिंग कोच ब्रायन लारा आणि फिरकी प्रशिक्षक मुथय्या मुरलीधरन यांच्याबरोबर वेगावान गोलंदाज प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहे. त्याच्या मुशीत उमरान मलिक सारखा वेगवान गोलंदाज आपल्या वेगाची धार अजून वाढवण्यासाठी घाम गाळतोय.

Web Title: Srh Bowling Coach Dale Steyn Took Autograph Of Ms Dhoni Photo Gone Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top