Aniket Verma’s Half-Century Lifts Sunrisers Hyderabad : सनरायझर्स हैदराबादच्या मदतीला आज २३ वर्षीय अनिकेत वर्मा धावून आला. ४ बाद ३७ अशी अवस्था केल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा संघ निर्धास्त झाला होता. पण, २३ वर्षीय फलंदाज मैदानावर उभा राहिला आणि त्याच्या जोडीला हेनरिच क्लासेनसारखा अनुभवी फलंदाज होता. या दोघांनी SRH ची गाडी रुळावर आणली. अनिकेतचा झेल टाकण्याची चूक DC ला चांगलीच महागात पडली. पण, मिचेल स्टार्कने पाच विकेट्स घेतल्या आणि हैदराबादचा संघ १८.४ षटकांत तंबूत परतला.