SRH vs DC who is zeeshan ansari? इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वात वादळी फलंदाजांची फौज असेलल्या सनरायझर्स हैदराबादला आज दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी शांत ठेवले. अभिषेक शर्मा पहिल्याच षटकात दुर्दैवी रन आऊट झाला. त्यानंतर मिचेल स्टार्कने तीन धक्के देताना SRH ची अवस्था ४ बाद ३७ अशी केली. ५१ धावांवर त्यांना पाचवा धक्का बसला असता, परंतु अनिकेत वर्माचा झेल टाकला गेला. दरम्यान, सनरायझर्स हैदराबादने आजच्या सामन्यात रिषभ पंतच्या 'भिडू' ला पदार्पणाची संधी दिली. २५ वर्षीय खेळाडूची आयपीएलपूर्वीच जोरदार चर्चा रंगली होती आणि आज त्याचा खेळ पाहण्यासाठी सारे उत्सुक आहेत.