आम्ही ऑक्शनमध्ये 'माती' खाल्ली! CSK च्या खराब कामगिरीवर स्टीफन फ्लेमिंगने मान्य केली चूक; MS Dhoni बाबत म्हणाला...

CSK Coach Stephen Fleming : चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी IPL 2025 मधील सातव्या पराभवानंतर आपली चूक मान्य केली. CSK च्या यंदाच्या खराब कामगिरीमागे संघ रचनेतील घोळ आणि ऑक्शनदरम्यानचे चुकीचे निर्णय हे मुख्य कारण असल्याचे त्यांनी कबूल केले. सात मॅचमध्ये पराभव पत्करणाऱ्या या अनुभवी संघासाठी ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे.
Stephen Fleming
Stephen Fleming esakal
Updated on

CSK suffers 7th loss in IPL 2025 as coach admits auction strategy failed

चेन्नई सुपर किंग्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये घरच्या मैदानावर आणखी एक पराभव पत्करावा लागला. सनरायझर्स हैदराबादने करो वा मरो लढतीत बाजी मारून CSK चे प्ले ऑफचे स्वप्न जवळपास संपुष्टात आणले आहे. चेपॉकवरील हा चेन्नईचा सलग चौथा पराभव ठरला. यापूर्वी २००८च्या आयपीएलचे शेवटचे दोन आणि २०१०च्या पर्वाचे सुरुवातीचे दोन असे घरच्या मैदानावरील सलग चार सामने CSK ने गमावले होते. चेन्नईला यंदाच्या पर्वात ९ सामन्यांत २ विजय मिळवता आले आहेत आणि उर्वरित ५ सामने जिंकून ते फक्त १४ गुणांपर्यंतच पोहोचू शकतील. अशात त्यांचे प्ले ऑफचे स्वप्न संपल्यात जमाच म्हणावे लागेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com