गावसकराचा दावा; T-20 वर्ल्डकप वेळी भारतीय यॉर्कर किंगची होणार धमाकेदार एंट्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sunil Gavaskar Said T Natarajan Play 20 World Cup

गावसकराचा दावा; T-20 वर्ल्डकप वेळी भारतीय यॉर्कर किंगची होणार धमाकेदार एंट्री

IPL 2022: भारताचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावसकर यांनी एक मोठा दावा केला आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी संघात पुनरागमन करण्याच्या शर्यतीत काही खेळाडू आहे. त्यामध्ये सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी नटराजन देखील आहे. नटराजन बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. यंदाच्या T20 विश्वचषकात टी नटराजन भारताकडून खेळताना दिसणार आहे. असे मत सुनील गावसकर यांनी मांडले आहे. (Sunil Gavaskar Said T Natarajan Play 20 World Cup)

हेही वाचा: जडेजाच नव्हे, या १० खेळाडूंनाही IPL मध्येअर्ध्यातच सोडावे लागले कर्णधारपद

टी नटराजनने गुडघ्यावरील शस्त्रक्रियेनंतर आयपीएल 2022 च्या डेथ ओव्हर्समध्ये चांगल्या गोलंदाजीमुळे सर्वाना हैराण केले आहे. त्याने 8 सामन्यात 8.41 च्या इकॉनॉमी रेटने 15 विकेट घेतले आहेत. स्टार स्पोर्ट्सवरील क्रिकेट लाइव्ह शोमध्ये गावसकर म्हणाले की नटराजन चांगली कामगिरी करत आहे. हे पाहणे चांगले वाटत आहे. कारण काही काळ असे वाटत होते की भारताने आता त्याला गमावले आहे. डेथ ओव्हर्समध्ये तो शानदार गोलंदाजी करतो.

हेही वाचा: ऋतुराज गायकवाडची सचिन तेंडुलकरच्या 'त्या' विक्रमाशी बरोबरी

तमिळनाडूच्या या वेगवान गोलंदाजाने कोविड-19 मुळे अनेक सामने गमावले आहे. तसेच त्यानी दुखापतीला हे मागे सोडले आहे. ऑस्ट्रेलियातील T20 विश्वचषक स्पर्धेसाठी त्याची निवड होईल असा विश्वास गावसकर यांनी व्यक्त केला आहे. देशासाठी २०२०/२१ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये नटराजन शानदार पदार्पण केले आहे. गेल्या वर्षी दुखापतीमुळे तो आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करू शकला नव्हता. पण सध्या तो आत्मविश्वासाने भरलेला दिसत आहे. त्यामुळेच तो शानदार गोलंदाजी करत आहे. गावस्कर पुढे म्हणाले की, आयपीएल 2022 मध्ये नटराजन आता त्याचा ट्रेडमार्क यॉर्कर फेकण्याव्यतिरिक्त चेंडू उशिरा स्विंग करू पाहत आहे, जे पाहून छान वाटते आहे.

Web Title: Sunil Gavaskar Said That T Natarajan Will Play T20 World Cup For India Ipl 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top