ऋतुराज गायकवाडची सचिन तेंडुलकरच्या 'त्या' विक्रमाशी बरोबरी | Ruturaj Gaikwad Record IPL | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ruturaj Gaikwad Record IPL

ऋतुराज गायकवाडची सचिन तेंडुलकरच्या 'त्या' विक्रमाशी बरोबरी

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर रविवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना खेळला गेला. CSK चा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शानदार खेळी केली. गायकवाडचे हंगामामधील पहिले शतक अवघ्या एका धावेने हुकले. त्याला टी नटराजनने 99 धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मात्र आपल्या या शानदार खेळीच्या जोरावर गायकवाडने सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. (Ruturaj Gaikwad Equals Sachin Tendulkar record in IPL)

हेही वाचा: लाईव्ह मॅचमध्ये मुकेश चौधरीवर का भडकला धोनी, नेमकं झालं तरी काय?

ऋतुराजने आपल्या खेळीच्या जोरावर आयपीएलमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या आहे. आयपीएललीग मध्ये हजार धावा करण्यासाठी त्याने 31 डाव घेतले आहे. आणि आता त्याने सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. आयपीएलमध्ये सर्वात जलद 1000 धावा करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर होता. या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी सचिनला ही 31 डाव लागले होते.(Ruturaj Gaikwad Record IPL)

चेन्नई सुपर किंग्जकडून सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गायकवाड व्यतिरिक्त डेव्हन कॉनवेने 85 धावांची नाबाद खेळी खेळली. दोन्ही खेळाडूंमध्ये पहिल्या विकेटसाठी 182 धावांची भागीदारी झाली. आयपीएलच्या इतिहासात सीएसकेसाठी कोणत्याही विकेटसाठीची ही सर्वोच्च भागीदारी आहे. यापूर्वी 2020 मध्ये शेन वॉटसन आणि फाफ डू प्लेसिस यांच्यात 181 धावांची भागीदारी झाली होती.

हेही वाचा: ऋतुराज गायकवाडची सचिन तेंडुलकरच्या 'त्या' विक्रमाशी बरोबरी

ऋतुराज गायकवाड 99 आणि डेव्हन कॉनवे ८५ यांच्या शानदार खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी २०३ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. हैदराबाद संपूर्ण षटक खेळल्यानंतरही सहा गडी बाद केवळ 189 धावा करू शकला. सनरायझर्सने 13 धावांनी सामना हरला.

Web Title: Ruturaj Gaikwad Joint Fastest Indian To Score 1000 Runs Equals Sachin Tendulkar Record In Ipl

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top