DC vs SRH : काव्याची कळी खुलली! घरच्या मैदानावरच्या पराभवाचा वचपा दिल्लीच्या घरात घुसून काढला

DC vs SRH : काव्याची कळी खुलली! घरच्या मैदानावरच्या पराभवाचा वचपा दिल्लीच्या घरात घुसून काढला

DC vs SRH Live : सनराईजर्स हैदराबादने आपल्या घरच्या पराभवाचा बदला दिल्लीच्या होम ग्राऊंडवर घुसून घेतला. अरूण जेटली स्टेडियमवर हैदराबादने दिल्लीचा 9 धावांनी पराभव करत दिल्लीला तळातच ठेवले. हैदराबादने ठेवलेल्या 198 धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या झुंजार फलंदाजांनी 6 फलंदाजांच्या मोबदल्यात 188 धावांपर्यंत मजल मराली. मिचेल मार्शने 63 तर फिल्प सॉल्टने 59 धावांची धडाकेबाज खेळी केली. मात्र हे दोघे बाद झाल्यावर दिल्लीची गाडी घसली.

सनराईजर्स हैदराबादचे 198 धावांचे मोठे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सला भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकात धक्का दिला. त्याने कर्णधार डेव्हिड वॉर्नरला दुसऱ्याच चेंडूवर शुन्यावर बाद केले.

मात्र यानंतर फिल्प सॉल्ट आणि मिचेल मार्श यांनी सनराईजर्स हैदराबादच्या एकेका गोलंदाजाची धुलाई करण्यास सुरूवात केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 112 धावांची दमदार भागीदारी रचत हैदराबादच्या गोटातील वातावर टाईट करण्यास सुरूवात केली. फिल्प सॉल्टने 35 चेंडूत 59 धावा ठोकल्या. आज त्याच्या बॅटमधून चौकारांची बरसातच झाली. त्याने 9 चौकार मारले.

दरम्यान, तितक्याच आक्रमकतेने साथ देणाऱ्या मिचेल मार्शने षटकारांचा पाऊस पाडला. त्याने देखील आपल्या अर्धशतकी खेळीत 5 षटकार मारले होते. अखेर ही जोडी मार्कंडेयने फोडली. त्याने सॉल्टला 59 धावांवर बाद केले. पाठोपाठ अभिषेक शर्माने मनिष पांडेला 1 धावेवर बाद करत दिल्लीला तिसरा धक्का दिला.

दिल्लीला विजयसाठी 41 चेंडूत 73 धावांची गरज असताना सेट झालेला मिचेल मार्श 63 धावा करून बाद झाला. त्याला अकिल हुसैनने बाद केले. यानंतर दिल्लीची गाडी रूळावरून घसरली. प्रियम गर्ग 12 तर सर्फराज खान 9 धावा करून बाद झाला. अखेर सामना 6 चेंडूत 26 धावा असा आला. मात्र भुवनेश्वर कुमारने शेवटच्या षटकात टिच्चून मारा करत सामना 3 चेंडूत 21 धावा असा आणला होता. अखेर अक्षरने चौथ्या चेंडूवर षटकार मारत सामना 2 चेंडू 15 धावा असा आणला. भुवीने शेवटच्या दोन चेंडूत 5 धावा देत हैदराबादचा विजय निश्चित केला. हैदराबादने 9 धावांनी सामना जिंकला.

नाणेफेक जिंकून प्रथम फंलंदाजी करणाऱ्या सनराईजर्स हैदराबादच्या फक्त दोन फलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सला जेरीला आणले. सलामीवीर अभिषेक शर्मा (67) आणि हेन्रिच क्लासेनने (53) अर्धशतकी खेळी करत हैदराबादला 20 षटकात 6 बाद 197 धावांपर्यंत पोहचवले. दिल्लीकडून मिचेल मार्शने भेदक मारा करत 4 षटकात 27 धावा देत 4 फलंदाज बाद केले. दिल्लीचे मुकेश कुमार, नॉर्त्जे आणि इशांत शर्मा हे महागडे ठरले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com