IPL 2023 : काव्या मारनचा हुकमी नाणं खणखणलं! 13.25 कोटींच्या खेळाडूचा धमाका, ठोकलं IPLचं पहिलं शतक

हॅरी ब्रुक यंदाच्या ‘आयपीएल’चा पहिला शतकवीर अन् हैदराबादचा कोलकातावर विजय
Harry Brook IPL 2023
Harry Brook IPL 2023 sakal

Harry Brook IPL Century: यंदाच्या आयपीएलमध्ये पहिले शतक करणाऱ्या हॅरी ब्रुकच्या या झंझावाती खेळीमुळे यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक 228 धावसंख्या उभारणाऱ्या हैदराबादने कोलकताचा 23 धावांनी पराभव करून आपला दुसरा विजय मिळवला. इंग्लंडचा हॅरी ब्रुक धडाकेबाज फलंदाज म्हणून ओळखला जातो. सलामीला खेळण्याची मिळालेल्या संधीचे ब्रुकने सोने केले.

सनरायझर्स हैदराबाद टीम सीईओ काव्या मारन आहे. त्याने या लिलावात मोठा सट्टा खेळला आणि हॅरी ब्रूकवर 13.25 कोटी रुपये देऊन संघात सामील करून घेतले. काव्या मारनच हुकमी नाणं खणखणलं. हॅरी ब्रूकने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 12 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 55 चेंडूंत IPL 2023 चे पहिले शतक ठोकले.

Harry Brook IPL 2023
PAK vs NZ: पाकिस्तानसमोर न्यूझीलंड संघाने टाकल्या नांग्या, अवघ्या 6 धावांत 5 गमावल्या विकेट अन्...

३ बाद २० अशा संकटात सापडलेल्या कोलकता संघाचा किल्ला कर्णधार नितीश राणाने (७५) लढवला आणि गेल्या सामन्यात अखेरच्या पाच चेंडूत पाट षटकार मारणाऱ्या रिंकू सिंगने आजही वेगवान अर्धशतक केले, परंतु आव्हान आवाक्याबाहेरचेच ठरले.

भल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करायचा तर कोलकताला दणदणीत सलामी आवश्यक होती, परंतु हैदराबादच्या भुवनेश्वर कुमारने पहिल्याच चेंडूवर गुरबाझला बाद केले. त्या नंतर यान्सेनने सलग दोन चेंडूंवर व्यंकटेश अय्यर आणि सुनील नारायण यांना परतीचा रस्ता दाखवला त्यामुळे कोलकताची ३ बाद २० अशी अवस्था झाली. कोलकता संघ अडचणीत असताना उम्रान मलिकच्या पहिल्या षटकाने त्यांना संजिवनी मिळाली. नितीन राणाने चौकार-षटकरांची बरसत करत २९ धावां कुटल्या.

Harry Brook IPL 2023
Team India : बीसीसीआयचा मोठा निर्णय! WTC फायनलनंतर टीम इंडियाला मिळणार नवीन 'बॉस'

मयांत अगरवाल आणि राहुल त्रिपाठी झटपट बाद झाले, परंतु ब्रुकच्या झंझावातावर त्याचा परिणाम झाला नाही. कर्णधार मार्करमनेही तेवढीच आक्रमक फलंदाजी करताना २६ चेंडूत अर्धशतक केले. हैदराबादचा संघ मोठी धावसंख्या उभारणार हे तेव्हाच स्पष्ट झाले होते.

मार्करम बाद झाल्यानंतर आलेल्या अभिषेक शर्माने १७ चेंडूत ३२ धावांचा झंझावात सादर केला. त्यानंतर आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या क्लासेनच्या सहा चेंडूतील १६ धावांमुळे हैदराबादने २२८ धावा केल्या. ब्रुक बरोबर १०० धावा करून नाबाद राहिला.

फलंदाजीच्या क्रमवारीत बदल

हैदराबाद संघाने आज फलंदाजीच्या क्रमवारीत महत्त्वाचा बदल करताना हॅरी ब्रुकला सलामीला पाठवले आणि हा बदल त्यांच्यासाठी भलताच फलदायी ठरला. पहिल्याच चेंडूवर चौकार मारून त्याने आपला हिसका दाखवण्यास सुरुवात केली. त्याचा दणका २०व्या षटकापर्यंत कायम होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com