
Sunrisers Hyderabad Owner Kavya Maran Video viral After Ishan Kishan century: इंडियन प्रिमिअर लीगच्या लिलावापासूनच चर्चेत असलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएलच्या १८ व्या हंगामाला दमदार विजयाने सुरूवात केली. राजस्थान रॉयल्सविरूद्ध प्रथम फलंदाजी करताना त्यांनी तब्बल ६ बाद २८७ धावा उभारल्या व ४४ धावांनी हा सामना जिंकला. सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना दावखुऱ्या इशान किशनने दमदार शतक ठोकले. इशानच्या या धडाकेबाज कामगिरीनंतर ज्यावेळी त्याला संघात करारबद्ध त्यावेळी SRH संघाची मालकिण काव्या मारनने दिलेली रिअॅक्शन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.