SRH vs KKR : कोलकाताने हैदराबादचा केला 5 धावांनी पराभव

Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders
Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders esakal

Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders : कोलकाता नाईट रायडर्सने शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात सनराईजर्स हैदराबादचा 5 धावांनी पराभव करत बदला घेतला. सनराईजर्स हैदराबादने केकेआरच्या त्यांच्या घरच्या मैदानावर पराभव केला होता. आता या पराभवाचे उट्टे केकेआरने काढले.

केकेआरच्या 172 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला 20 षटकात 8 बाद 166 धावांपर्यंतच मजल मारता आली. केकेआरकडून शेवटचे षटका टाकणाऱ्या वरूण चक्रवर्तीने 9 धावा सेव्ह करताना षटकात देत 1 विकेट घेत फक्त 3 धावा दिल्या. याचबरोबर शार्दुल ठाकूरने देखील 3 षटकात 23 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. हैदराबादकडून कर्णधार माक्ररमने सर्वाधिक 41 धावा केल्या.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने सनराईजर्स हैदराबादसमोर विजयासाठी 172 धावांचे आव्हान ठेवले. केकेआरकडून रिंकू सिंहने 46 धावांची तर कर्णधार नितीश राणाने 42 धावांची खेळी केली. मात्र केकेआरच्या इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. हैदराबादकडून मार्को जेनसेन आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. यांना भुवनेश्वर कुमार, कार्तिक त्यागी, एडिन माक्ररम आणि मार्कंडेय यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

रिंकू - राणाची दमदार खेळी 

केकेआरची टॉप ऑर्डर स्वस्तात माघारी झाल्यानंतर कर्णधार नितीश राणाने 42 धावांची खेळी केली तर रिंकू सिंहने 46 धावांचे मोलाचे योगदान दिले. त्याला आंद्रे रसेलने 15 चेंडूत 28 धावा करून चांगली साथ दिली. यामुळे केकेआर 130 धावांपर्यंत पोहचला. मात्र रिंकूला ही साथ शेवटपर्यंत मिळाली नाही. टॉप ऑर्डर प्रमाणे केकेआरच्या खालच्या फळीने देखील निराशा केली. सुनिल नरेन 1 तर शार्दुल ठाकूर 8 धावा करून बाद झाले. अखेर रिंकू सिंहने शेवटच्या षटकापर्यंत किल्ला लढवत केकेआरला 20 षटकात 9 बाद 171 धावांपर्यंत पोहचवले.

35-3  : जेसन रॉयला त्यागीने केले बाद 

मार्कोने केकेआरला पाठोपाठ दोन धक्के दिल्यानंतर जेनस रॉय केकेआरचा डाव सावरत होता. मात्र त्याला कार्तिक त्यागीने 20 धावांवर बाद करत तिसरा धक्का दिला. यानंतर रिंकू सिंह आणि कर्णधार नितीश राणा यांनी केकेआरचा डाव सारवला. या दोघांनी भागीदारी रचत केकेआरला 9 षटकात 73 धावांपर्यंत पोहचवले.

16-2 : मार्को जेनसेनने केकेआरला दिले दोन धक्के

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला मार्को जेनसेनने एकाच दोन धक्के दिले. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मार्केने रेहमनुल्ला गुराबजला शुन्यावर बाद केले. याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर व्यंकटेश अय्यर देखील 7 धावांवर बाद झाला.

केकेआरने नाणेफेक जिंकली

कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com