MS Dhoni - Suresh Raina: गरजेला मित्राचाच आधार! धोनीला पायऱ्या उतरताना रैनाने दिला मदतीचा हात, Video होतोय तुफान व्हायरल

MS Dhoni - Suresh Raina: चेन्नई सुपर किंग्सने एमएस धोनी आणि सुरेश रैना यांची मैत्री दाखवणारा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओने अनेक चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
MS Dhoni - Suresh Raina
MS Dhoni - Suresh RainaX/ChennaiIPL

MS Dhoni - Suresh Raina Video: भारताचे माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि एमएस धोनी हे मैदानाबाहेरही खूप चांगले मित्र आहे, याचा प्रत्येय अनेकदा चाहत्यांना आला आहे. ते भारतीय संघातच नाही, तर आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाकडून अनेक वर्षे एकत्र खेळले. आता पुन्हा एकदा त्यांच्यातील मैत्रीचे दर्शन झाले आहे.

चेन्नई सुपर किंग्सने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत आहे. हा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर झालेल्या आयपीएल 2024 मधील सामन्यानंतरचा आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की चेन्नईचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी पायऱ्या उतरत असताना त्याला या आयपीएलमध्ये समालोचकाच्या भूमिकेत असलेल्या सुरेश रैनाने हात देत आधार दिला.

MS Dhoni - Suresh Raina
Pat Cummins: 'आपल्याविरुद्ध जो खेळेल त्याच्या मनात भीतीच...', RCB वरील विजयानंतर SRH कॅप्टन कमिन्स काय म्हणाला ऐका

खरंतर धोनी गेल्या हंगामापासून गुडघ्याच्या दुखातीचा सामना करता आहे. त्याने आयपीएल 2023 नंतर गुडघ्यावर शस्त्रक्रियाही करून घेतली होती. त्यातून तो बऱ्यापैकी सावरला असला, तरी अद्याप तो कधीकधी चालताना संघर्ष करतानाही दिसला आहे.

मुंबई विरुद्धच्या सामन्यानंतरही त्याला पायऱ्या उतरताना त्रास होत होता, त्याचवेळी रैनाने त्याला हात देत आधार दिला. यानंतर हे दोन्ही मित्र एकमेकांचा निरोप घेऊन आपापल्या वाटेने निघाले. धोनी अजून चेन्नईकडून खेळत असला, तरी रैनाने काही वर्षांपूर्वीच निवृत्ती घेतली असून आता तो समालोकन करताना दिसतो.

MS Dhoni - Suresh Raina
KKR vs RR: नाणेफेकीपूर्वीच्या 'किस'चा अय्यरला झाला नाही फायदा; सॅमसनही चकीत, पाहा VIDEO

एकाच दिवशी घेतलेली आंतरराष्ट्रीय निवृत्ती

दरम्यान, धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्याच्या या घोषणेनंतर रैनानेही काही वेळातच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. रैना आणि धोनीने चेन्नईकडूनही अनेक वर्षे एकत्र क्रिकेट खेळले असून चेन्नईसाठी 5000 धावा करण्याचा विक्रमही केवळ या दोघांनाच करता आला आहे.

धोनीने सोडले नेतृत्व

धोनी यंदा त्याचा अखेरचा आयपीएल हंगाम खेळत असल्याची सध्या चर्चा होत आहे. कारण या हंगामापूर्वी त्याने चेन्नई संघाच्या नेतृत्वपदावरूनही पायउतार होण्याचा निर्णय घेतला. त्याने ही जबाबदारी आता ऋतुराज गायकवाडच्या हाती सोपवली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com