CSK vs SRH : चेन्नई-हैदराबादमध्ये आज ‘करो या मरो’ची लढत; कोण टिकवेल प्ले-ऑफचं स्वप्न?
IPL2025 Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad : चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात उद्या होत असलेली लढत ही अस्तित्वाची लढाई असणार आहे. प्लेऑफची आशा जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही संघ तिसऱ्या विजयासाठी सज्ज झाले आहेत.
चेन्नई : चेन्नई सुपर किंग्स व सनरायझर्स हैदराबाद या दोन संघांमध्ये उद्या (ता. २५) आयपीएल साखळी फेरीची लढत रंगणार आहे. यंदाच्या मोसमात चेन्नई व हैदराबाद या दोन्ही संघांना अपयशाचा सामना करावा लागला आहे.