IPL Sponsor : बीसीसीआयचा IPL टायटल स्पॉन्सर TATA ला टाटा...? गव्हर्निंग काऊन्सीलनं काढली निविदा

IPL Sponsor TATA
IPL Sponsor TATAesakal

IPL Sponsor : इंडियन प्रीमियर लीगच्या आधी जगातील एक सर्वात मोठा उद्योग समुह टाटांच नाव जोडलं गेलं होते. आयपीएलचे टाटा हे टायटल स्पॉन्सर होते. मात्र 2023 च्या हंगामानंतर टाटांकडे ही आयपीएलची टायटल स्पॉन्सरशिप न राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बीसीसीआय इंडियन प्रीमियर लीग 2024 ते 2028 या हंगामासाठी टायटल स्पॉन्सरचे हक्क विकण्यासाठी निविदा काढणार आहे. याबाबतची घोषणा बीसीसीआयने केली आहे.

IPL Sponsor TATA
Andre Russell : 2 वर्षांनंतर संघात आला अन् पहिल्याच सामन्यात केला कहर

टाटा उद्योग समुहाकडे 2023 च्या हंगामापर्यंतची आयपीएल टायटल स्पॉन्सरशिप होती. आता बीसीसीआयने पुढील चार वर्षांच्या टायटल स्पॉन्सरशिपसाठी निविदा प्रसिद्ध केली आहे.

चीनसोबतचे भारताचे राजकीय संबंध बिघडल्यानंतर चायनिज मोबाईल निर्माता कंपनी विवोने आयपीएलची टायटल स्पोन्सरशिप सोडली होती. त्यानंतर दोन वर्षे ड्रीम 11 ही आयपीएलची टायटल स्पॉन्सर होती. त्यानंतर टाटा हे आयपीएलचे टायटल स्पॉन्सर आहेत.

बीसीसीआयने आपल्या वक्तव्यात सांगितले की, 'आयपीएल गव्हर्निंग काऊन्सीलने हंगाम 2024 ते 2028 साठी टायटल स्पॉन्सरचे हक्क मिळवण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली आहे.

IPL Sponsor TATA
Team India Squad U19 WC 24 : वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा! 'या' खेळाडूकडे संघाची धूरा

बीसीसीआयने सांगितल्यानुसार, 'निविदा प्रक्रियेबाबत सविस्तर नियम आणि अटी, पात्रता टेंडर सादर करण्याची पद्धत, अधिकार आणि जबाबदारी या सर्व गोष्टींचा समावेश आयटीटी डॉक्युमेंटमध्ये करण्यात आला आहे. या आयटीटी डॉक्युमेंटचे शुल्क हे 5 लाख रूपये आहेत.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com