Team India Head Coach : लक्ष्मण होणार द्रविड यांचे उत्तराधिकारी? गंभीर, लँगर यांचीही नावे चर्चेत

New Head Coach Team India: राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदाची सध्या जबाबदारी सांभाळत असलेले व्ही.व्ही.एस. लक्ष्मण हे भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी राहुल द्रविड यांचे उत्तराधिकारी असण्याची शक्यता अधिक आहे; परंतु...
Team India Head Coach
Team India Head Coachsakal

Team India Head Coach : राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदाची सध्या जबाबदारी सांभाळत असलेले व्ही.व्ही.एस. लक्ष्मण हे भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी राहुल द्रविड यांचे उत्तराधिकारी असण्याची शक्यता अधिक आहे; परंतु गौतम गंभीर आणि ऑस्ट्रेलियाचे जस्टीन लँगरही उत्सुक असतील का, अशी चर्चा भारतीय क्रिकेट वर्तुळात सुरू झाली आहे.

नव्या प्रशिक्षपदासाठी बीसीसीआयने अधिकृतपणे जाहिरात प्रसिद्ध केली. तिन्ही प्रकारासाठी एकच प्रशिक्षक असतील असे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे. त्यानंतर या पदासाठी शोध सुरू झाला आहे. नव्या प्रशिक्षकांची डिसेंबर २०२७ पर्यंत मुदत असणार आहे.

Team India Head Coach
Hingoli Lok Sabha : हिंगोली लोकसभेसाठी रस्सीखेच; आघाडी व युतीतील उमेदवारात होणार ताणतणाव, इच्छुकांची नावे चर्चेत

राहुल द्रविड यांना पुन्हा मुख्य प्रशिक्षक व्हायचे असेल तर त्यांना रीतसर अर्ज करावा लागेल, असेही सांगण्यात आले आहे; परंतु अगोदरच येत्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत मुदतवाढ मिळालेले द्रविड पुन्हा अर्ज करण्याची शक्यता फारच कमी आहे.

राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक होण्याअगोदर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख होते. त्याप्रमाणे लक्ष्मण यांना तशीच संधी असेल. तसेच काही द्विराष्ट्रीय मालिकांसह आशियाई क्रीडा स्पर्धेत द्रविड यांच्या अनुपस्थितीत लक्ष्मण यांनी मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. त्यामुळे अर्ज केला तर लक्ष्मण यांना पसंती मिळण्याची शक्यता अधिक आहे.

रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमीसारखे वरिष्ठ खेळाडू अजून दोन वर्षे तरी खेळणार असल्यामुळे मुख्य प्रशिक्षकपदासाठी माजी वरिष्ठ खेळाडूलाच प्राधान्य दिले जाऊ शकते. त्यामुळे गौतम गंभीरही या शर्यतीत येऊ शकतात.

Team India Head Coach
दिल्लीच्या विजयामुळे बदललं CSK, RCB अन् SRHचं नशीब! कोणाला झाला फायदा अन् कोणाचं नुकसान? जाणून घ्या समीकरण

गंभीर हे भारताने मिळवलेल्या दोन्ही विश्वकरंडक (ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय) संघातील सदस्य होते. त्यांच्याकडे कसोटी क्रिकेटमधील अनुभवही दांडगा आहे. कोलकता संघाला त्यांनी आयपीएलची दोन विजेतीपदे मिळवून दिलेली आहे. सध्या ते कोलकता संघाचे मेंटॉर आहेत. हीच जबाबदारी त्यांनी गत आयपीएलमध्ये लखनौ संघासाठी सांभाळली होती. गंभीर हे गेली पाच वर्षे खासदार होते. यंदा त्यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतलेली असल्यामुळे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी ते सांभाळू शकतात.

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी परदेशी व्यक्तीही अर्ज करू शकतात, असे शहा म्हणालेले आहेत, त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू जस्टीन लँगर उत्सुक असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com