Hingoli Lok Sabha : हिंगोली लोकसभेसाठी रस्सीखेच; आघाडी व युतीतील उमेदवारात होणार ताणतणाव, इच्छुकांची नावे चर्चेत

आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात सर्वच राजकीय पक्षाचे इच्छुक उमेदवार जोमाने कामाला लागले असून हिंगोली लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी अनेकांची नावे आत्तापासूनच चर्चेत येऊ लागली आहेत.
hingoli lok sabha election political party aghadi and yuti candidate name vote politics
hingoli lok sabha election political party aghadi and yuti candidate name vote politicsesakal

हदगाव : आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात सर्वच राजकीय पक्षाचे इच्छुक उमेदवार जोमाने कामाला लागले असून हिंगोली लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी अनेकांची नावे आत्तापासूनच चर्चेत येऊ लागली आहेत.

महाविकास आघाडी व युतीतील उमेदवारांमध्ये उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच होणार असून सर्वच उमेदवार तगडे असल्याने या उमेदवारात ताणतणाव तर होईलच परंतु पक्षालाही उमेदवार निवडण्यामध्ये मोठी डोकेदुखी होणार आहे. सर्वच इच्छुक उमेदवारांनी आपापल्या पद्धतीने मतदारसंघ पिंजून काढत मीच कसा योग्य उमेदवार राहील, या पद्धतीने काम सुरू केले आहे.

महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठा पक्षातर्फे जिल्हाप्रमुख माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, काँग्रेसकडून डॉ. अंकुश देवसरकर, डॉ. प्रज्ञा सातव तर युतीकडून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्यासह भाजपकडून रामदास पाटील सुमठाणकर व श्रीकांत पाटील शेवाळकर हे प्रयत्नशील आहेत.

माजी आमदार आष्टीकर, खासदार हेमंत पाटील व आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांना सभागृहाचा व मतदारसंघाचा अनुभव आहे तर डॉ. देवसरकर, सुमठाणकर व श्रीकांत पाटील हे तिघेही नवखे उमेदवार आहेत.

डॉ. देवसरकर हे डॉक्टर असून त्यांचा रुग्ण, नातेवाईक यांच्याशी संपर्क राहिलेला आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघातील देवसरी (ता. उमरखेड) हे त्यांचे मूळ गाव. प्रज्ञा सातव ह्या माजी खासदार तथा काँग्रेस पक्षाचे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय राजीव सातव यांच्या त्या पत्नी असून स्वर्गीय पती राजीव सातव यांची मतदारसंघातील लोकप्रियता पाहता पक्ष माझ्या उमेदवारीला पसंती देईल, या हेतूने प्रज्ञा सातव ह्या सुद्धा मतदार संघात कामाला लागल्या असल्याचे दिसून येत आहे.

माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर हे २०१४ ते २०१९ या काळात त्यांनी हदगाव मतदारसंघाचे नेतृत्व केले असून हिंगोली लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी त्यांनीही गेली पाच वर्षापासून दांडगा संपर्क वाढवलेला आहे.

रामदास पाटील सुमठाणकर व श्रीकांत पाटील हे दोघेही भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक असून येथील लोकसभेची जागा शिंदे गटाला सुटणार नसून भारतीय जनता पक्ष ही जागा लढवेल आणि आपणासच उमेदवारी मिळणार, असा दावा करीत या दोन्ही इच्छुक उमेदवारांनीही संपूर्ण मतदारसंघात वालपोस्टर व इतर कार्यक्रमांद्वारे आपला संपर्क वाढविला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com