

Tim David Viral Video
esakal
आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू आहे. या हंगामातील २० वा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वापासून सुरू होईल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आपल्या मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून पराभव पत्करावा लागला होता. आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू मुंबईविरुद्ध मैदानात उतरणार आहे. सामन्यापूर्वी बंगळुरूचा खेळाडू टीम डेव्हिड याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यात डेव्हिड चाहत्याचा फोन हिसकावताना दिसत आहे. हा व्हायरल व्हिडिओ मुंबई विमानतळावरचा असल्याचं सांगितलं जात आहे.