IPL 2021: चेन्नई वि. कोलकाता ‘काँटे की टक्कर?’

फॉर्मात असलेल्या धोनीच्या संघाला विजयाची अधिक संधी
IPL 2021: चेन्नई वि. कोलकाता ‘काँटे की टक्कर?’
sakal

अबुधाबी : सलग दोन शानदार विजय मिळवून आपली ताकद सिद्ध करणारा धोनीचा चेन्नई संघ आणि वेगळी ऊर्जा मिळालेला कोलकाता संघ या तुल्यबळ संघांत उद्या होणारा आयपीएलचा सामना कोलकाता संघाकरिता बाद फेरीसाठीची दावेवारी प्रबळ करणारा ठरू शकणार आहे. ही उर्वरित आयपीएल सुरू होण्याअगोदर कोलकाता संघ गटांगळ्या खात होता; परंतु फिरकी अस्त्राच्या जोरावर त्यांनी या उर्वरित आयपीएलमध्ये आपले दैव बदलण्यास सुरुवात केली आणि अगोदर बंगळूर त्यानंतर मुंबई इंडियन्स यांचा पराभव करून नवा ट्रेंट निर्माण केला आहे.

IPL 2021: चेन्नई वि. कोलकाता ‘काँटे की टक्कर?’
IPL 2021 : संजूला 24 लाखाचा दंड; पुन्हा तीच चूक केली तर बॅन

वरुण चक्रवर्ती आणि सुनील नारायण यांना सुरुवातीपासून आक्रमणावर लावून प्रतिस्पर्धांना लय न मिळू देण्याचे त्यांचे डावपेच यशस्वी ठरत आहेत. त्यानंतर लॉकी फर्ग्युसन, प्रसिद्धकृष्णा आणि आंद्र रसेल, अशा वेगवान गोलंदाजांनी पकड कायम ठेवायचे, हा त्यांचा ट्रेंड चांगलाच यशस्वी ठरत आहे. उद्याच्या सामन्यात धोनीचे शिलेदार हा चक्रव्यूह कसा भेदतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

पुढे जाऊन कोलकाताने बाद फेरी गाठलीच आणि त्यांचा पुन्हा सामना करण्याची वेळ आली, तर त्यावर आत्ताच उत्तर शोधण्यासाठी चेन्नईला प्रयत्न करावे लागणार आहे. पहिल्या दोन सामन्यात सफाईदार विजय मिळवल्यामुळे चेन्नईत्या मोजक्याच फलंदाजांना फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. उद्या मात्र त्यांचा कस लागू शकतो.

कोलकाताचे फलंदाजही चांगल्या फॉर्मात आहेत. दोन्ही सामन्यांत सुरुवातीच्या फलंदाजांनीच मोहीम फत्ते केल्यामुळे त्यांच्याही मधल्या फळीतील फलंदाजांनी बॅट परजता आलेली नाही. उद्या कदाचित काँटे की टक्कर असल्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही; पण कोलकाताच्या तुलनेत चेन्नईची गोलंदाजी तेवढी भेदक नाही; पण धोनीचे कुशल नेतृत्व कोणत्याही खेळाडूकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेत असते, हे वारंवार सिद्ध झाले आहे. त्यामुळे हा सामना कमालीचा रंगतदार होईल, अशी अपेक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com