IPL 2025 Update: चिंता मिटली! Mumbai Indians चा प्रमुख खेळाडू संघाच्या मदतीसाठी येतोय, आता बघतोच संघाला कोण अडवतंय...

Trent Boult Set to Rejoin Mumbai Indians: इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या उर्वरित १६ सामन्यांचे सुधारित वेळापत्रक जाहीर झाले आहे. पण, परदेशी खेळाडूंना पुन्हा बोलावण्याचे आव्हान फ्रँचायझींना पेलावे लागतेय. कारण, आता प्रत्येक सामना फ्रँचायझीसाठी महत्त्वाचा आहे.
Mumbai Indians
Mumbai IndiansSakal
Updated on

Mumbai Indians star pacer rejoining team : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मधून चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद आदी संघांचे आव्हान संपुष्टात आले आहे. प्ले ऑफच्या शर्यतीत लखनौ सुपर जायंट्स, गतविजेता कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे काठावर आहेत. गुजरात टायटन्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांना प्रत्येकी १ विजय पुरेसा आहे. तेच पंजाब किंग्स व मुंबई इंडियन्स यांना अजून जोर लावावा लागणार आहे. मुंबईने पहिल्या ५ सामन्यांत फक्त १ विजय मिळवला होता, परंतु त्यांनी पुढील सहा सामने जिंकून प्ले ऑफच्या शर्यतीत मोठी झेप घेतली. आता ते १४ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहेत, पंरतु एक चूक त्यांना महागात पडू शकते. अशात त्यांच्या मदतीला प्रमुख खेळाडू धावला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com