
"मी त्याची..."; उमरान मलिक टीम इंडियामध्ये येताच गब्बरने ठोकला शड्डू
आयपीएलमध्ये रविवारी सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज मध्ये सामना खेळला गेला. मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये हा सामना झाला. शिखर धवनने सामन्याआधी स्टार स्पोर्ट्सशी खास गप्पा मारल्या. यासोबतच शिखर धवनने वेगवान गोलंदाज उमरान मलिकचे प्रथमच भारतीय संघात समावेश झाल्याबद्दल अभिनंदन केले.
धवन म्हणाला, या आयपीएल हंगामामध्ये आमचा संघ चांगला होता. परुंतु आम्ही काही विशेष कामगिरी करता आली नाही. आजून दोन तरी सामने जिंकलो असतो, तर पात्र ठरलो असतो. उमरानची संघात निवड झाल्याबद्दल अभिनंदन. त्याने ज्या पद्धतीने वेग राखला आणि विकेट्स घेतल्या, ते विलक्षण आहे. मी त्याची धुलाई करणार आहे.
हेही वाचा: टीम इंडियात परतल्यानंतर दिनेश कार्तिक भावूक; ट्विट करत म्हणाला
सनरायझर्स हैदराबादचा झंझावाती गोलंदाज उमरान मलिकचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचवेळी आयपीएलच्या चालू हंगामात शानदार खेळ दाखवूनही शिखर धवनला टीम इंडियामध्ये स्थान मिळाले नाही. या मालिकेसाठी शिखर धवनकडे टी-20 संघाची कमान सोपवली जाण्याची शक्यता होती, पण केएल राहुलने बाजी मारली.
हेही वाचा: शेतकऱ्याच्या मुलीने रचला इतिहास; 'ल्होत्से’ शिखर केले सर
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 8 गडी गमावून 157 धावा केल्या. अभिषेक शर्माने 43 आणि रोमॅरियो शेफर्डने नाबाद 26 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जने 29 चेंडू राखून 160 धावा करून लक्ष्य गाठले. इंग्लिश फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोनने नाबाद 49 आणि शिखर धवनने 39 धावा केल्या.
Web Title: Umran Malik Bowling India Cricket Team Statement Shikhar Dhawan Pbks Vs Srh Ipl 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..