
टीम इंडियात सिलेक्शन उमरान मलिकचं पण कौतुक इरफान पठाणचं?
Umran Malik : जम्मू-काश्मीरचा उमरान मलिक यांचे टीम इंडिया मध्ये निवड झाली आहे. काल आयपीएल लीगचा शेवटचा सामना होता. सनरायझर्स हैदराबाद साठी शेवटचा सामना खेळण्याआधी 22 वर्षीय वेगवान गोलदाज उमरान मलिकला टीम इंडियाचा कॉल आला. BCCI ने रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 9 जूनपासून सुरू होणाऱ्या T20 मालिकेसाठी उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांचा संघात निवड केले.
हेही वाचा: उमरान मलिकच्या वेगाचा कहर; मयंकला चेंडू लागताच जमिनीवर कोसळला
उमरान मलिकच्या निवडीवर माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने ट्विट करून त्याचे अभिनंदन केल आहे. इरफान म्हणाला की, उमरान मलिकची भारतीय संघात निवड झाल्याबद्दल अभिनंदन हा क्षण तुझ्यासाठी मोठा आहे. इरफान पठाणने खंर तर उमरान मलिकला शोधला आहे. त्यामुळे इरफान पठाणला टॅग करत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ट्विट केले की, इरफान पठाण तुझेही अभिनंदन. जम्मू-कश्मीर क्रिकेट असोसिएशनमध्ये काम करताना तुम्ही या धाकड़ गोलंदाजाला घेऊन आले.
हेही वाचा: "मी त्याची..."; उमरान मलिक टीम इंडियामध्ये येताच गब्बरने ठोकला शड्डू
उमरान आयपीएलमध्ये सातत्याने 150 किमी प्रती तास वेगाने गोलंदाजी करत होता. दिल्ली विरूद्धच्या सामन्यात तर त्याने 157 किमी प्रती तास वेगाने चेंडू टाकला होता. उमरान फक्त वेगात चेंडू टाकत नाही तर यंदाच्या हंगामात त्याने तब्बल 21 विकेट देखील घेतल्या आहेत. भारतीय संघाचे नेतृत्व केएल राहुल करणार असून यात ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक यांचा समावेश आहे.
Web Title: Umran Malik India Team Bcci Vice President Congratulate Irfan Pathan Ind Vs Sa
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..