
गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स संघ सध्या नवा कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळत आहेत. रहाणे चांगल्या फॉर्ममध्ये असला, तरी संघाची कामगिरी मात्र फारशी चांगली झालेली नाही. त्यांना पहिल्या ८ सामन्यांपैकी तीन सामनेच जिंकता आले आहेत.
अशात आता त्यांच्या संघाला एक चांगली बातमी मिळाली आहे. आयपीएलमधील सर्वात वेगवान चेंडू टाकणारा भारतीय गोलंदाज उमरान मलिक संघात दाखल झाला आहे. याबाबत कोलकाता नाईट रायडर्सने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.