इंडियन प्रीमिअर लीगमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे. या व्यासपीठापर्यंत पोहचण्यासाठी खेळाडू मेहनत घेतच असतो, परंतु त्याच्या यशामागे अनेकांचे योगदानही असते. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या विजयात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या वरुण चक्रवर्तीची कहाणी अशीच आहे. वरुण, जो मूळचा आर्किटेक्ट आहे, त्याने वयाच्या २५ व्या वर्षी क्रिकेटमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या खासगी आयुष्याबद्दल फारशी माहिती नाही, परंतु त्याची पत्नी नेहा खेडेकर ही त्याच्या यशामागील एक महत्त्वाची व्यक्ती आहे. दोघांनी २०२० मध्ये लग्न केले आणि त्यांना आथमन नावाचा मुलगा आहे.